You are currently viewing मुख्यमंत्री वयोश्री योजनेंचे अर्ज करण्यासाठी पंचायत समितीला संपर्क साधावा

मुख्यमंत्री वयोश्री योजनेंचे अर्ज करण्यासाठी पंचायत समितीला संपर्क साधावा

मुख्यमंत्री वयोश्री योजनेंचे अर्ज करण्यासाठी पंचायत समितीला संपर्क साधावा

सिंधुदुर्गनगरी

 मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे निकष पुर्ण करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी संबंधित पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.

  सामाजिक न्याय व विशेष सहायक विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत ६५ वर्ष व त्यापुढील असलेल्या ज्येष्ठ नागरीकांना साधने व उपकरणे खरेदीसाठी मदत केली जाणार आहे. तीन हजार रुपये ज्येष्ठ नागरिकांच्या वैयक्तीक आधार संलग्न बचत खात्यात वितरित केले जाणार आहे. या पैशातून त्यांना चष्मा, श्रवण यंत्र, ट्रायपॉड, स्टिल व्हील, वॉकर, कमोड खुर्ची, लंबर बेल्ट, असे साहीत्य खरेदी करता येईल. डीबीटी प्रणालीव्दारे लाभार्थ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे.

             सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६५ वर्षे किंवा त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानापरत्वे येणारे अपंगत्व,अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने. उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच मन:स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र आदीसाठी त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना सामाजिक न्याय विभागामार्फत सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पात्र ज्येष्ठ नागरिकांना रुपये ३ हजार रुपये मार्यादित डिबीटी प्रणालीव्दारे निधी वितरीत करण्यात येणार आहे अशी माहिती सामाजिक न्याय विभागाकडून देण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा