*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम लेख*
*मराठी भाषेवरील बेगडी प्रेम*
**********************
मी दि.२३ तारखेला दै लोकमतच्या ‘विचार’ सदरात *’प्रा मिलिंद जोशी*’ यांचा संपादकीय लेख वाचला त्याच शिर्षक असं होतं की *मराठीवरील आपले प्रेम बेगडी आहे का?* तर
माझं मत हो आहे.
त्याखाली आणखीन दोन ओळी अशा होत्या की *मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राजकीय पक्षांनी मतभेद विसरून एकत्र येण्याची गरज आहे.आजवर तसे होताना दिसले नाही.* तर ते
कधीच दिसणार नाही.सध्याचे राजकीय नेते फक्त सत्तेसाठी एकत्र आलेत त्यंच्या एकत्र येण्यात ना जनतेचा फायदा आहे ना महाराष्ट्राचा फायदा आहे ते एकत्र आल्याने कोणता विकास होणाराहे,विकास फक्त स्वतःचाच तेव्हा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कधी केव्हा कसा मिळेल की नाही यावर शंकाच आहे.तेव्हा मराठी भाषेसाठी ते एकत्र येऊच शकत नाही.ज्या मराठी भाषेवर महाराष्ट्राची धुरा आहे त्या महाराष्ट्रात परप्रांतीयांनी शिरकाव करून स्वतःच स्थान पक्के करून घेतले तरी सत्तेवर असलेले मराठी नेते काहीच करू शकले नाही.फक्त मतांचा विचार करून त्यांनी मराठी भाषेला वाळीत टाकले असंच म्हणावं लागेल.साधारण दहाबारा वर्षांपूर्वी *आदरणीय रंगनाथ पठारे* समितीने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी अहवाल लिहून केंद्र सरकारला सादर केला होता.या समितीत प्रमुखाने ख्यातनाम साहित्यिक *आदरणीय भालचंद्र नेमाडे, अशोक केळकर, मोहन धडफळे, ब्रह्मानंद देशपांडे* अशी मोठी माणसं या समितीत होती.खूप खटाटोप केली पण काय झालं सरकारने निवेदन स्वीकारले आणि विषय फाईल बंद झाला.मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी अनेक साहित्यिक मान्यवरांनी सभा घेतल्या,भाषणे केलीत,लेख प्रकाशित झालीत. महाराष्ट्रातील अनेक साहित्यिकांकडून पत्र मागवलीत पण आजवर झालं काय मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला नाही. पंतप्रधान कार्यालयात *मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष आदरणीय डॉ रावसाहेब कसबे* यांनी सतत पाठपुरावा करून दखल घ्यायला लावली पण त्यावर अंमलबजावणी झाली नाही.प्रत्येक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मूख्यमंत्रीपासून तर ईतर मंत्र्यांना बोलावले जाते तिथे सर्वसाक्षीने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून निवेदन दिले जाते.कार्यक्रम मुख्यमंत्री मंचावर खाली उतरले की सर्व काही भुईसपाट होते.खर पहायला गेले तर इतर राज्यातील जनता ते त्यांच्या भाषेला प्रथम प्राधान्य देतात कारण त्यांच्या भाषेवर त्यांचे खऱ्याअर्थाने प्रेम आहे.म्हणून इतर राज्यातील सरकारने त्यांच्या भाषेला केरळी,कानडी बंगाली, बिहारी जी काही त्यांची भाषा असेल तिला अभिजात भाषेचा दर्जा देऊन त्यांनी त्यांच्या भाषेचा सन्मान केला आहे.मी माझ्या व्यक्तिगत कामाकरता पुण्याला जाण्यासाठी एस टी ने प्रवास करत असताना शिर्डीला माझ्या शेजारी एका कंपनीचे अधीकारी येऊन बसलेत ते फोन वर माराठीतही बोलायचे आणि बिहारी टोन मधे हिंदीत ही बोलायचे. उत्सुकतेपोटी मी त्यांच्याशी बोलायला लागलो.तर ते माझ्या हिंदीत बोलायला लागले मी सहज म्हणून बोललो आपण मराठी आहोत तर मराठीत बोला ना तर ते म्हणाले.नहीं मैं बिहार से हुं गये बिस साल से पुणे मे रहेता हुं मेरी भाषा मेरी पहेचान है.मेरी भाषाने मुझे बडा किया बडा बनाया ईसलीये मेरी भाषा मेरे लिये सबकूछ हैं मै. मराठी भाषा सिर्फ जरूरत के लीये बोलता हुं.त्याचे बोलणं ऐकून मी सुखावलो की त्याची भाषा त्याला सर्व काही आहे मराठी भाषा फक्त त्याने गरजेपुरता ठेवली आहे.मी पुणे येईपर्यंत शांत बसून विचार करत राहिलो की मराठी माणूस किती मागे आहे.आपली मराठी भाषा आपली मातृभाषा असुनही आपलं प्रेम हे खरंच बेगडी आहे.उगाचच मराठी भाषा दिवस साजरा करून स्वत:ची चेष्टा करून घेतो.खरच आपलं मराठी भाषेवर प्रेम आहे का? मराठी माणसाचं मराठी भाषेवर प्रेम असतं तर मराठी शाळा बंद पडून इंग्रजी शाळा जन्माला आल्या नसत्या. शिक्षणासाठी मुलांना इंग्रजी शाळेत पाठवणे म्हणजे सध्याच्या पालकांना प्रतिष्ठेचा विषय झाला आहे.तोंडभरून मोठ्या अभिमानाने सांगतात की आमचा मुलगा इंग्लिश मिडीयम मध्ये शिकते.आहो या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेले *जेष्ठ साहित्यिक वंदनीय तात्यासाहेब शिरवाडकर,पु ल देशपांडे,शांताबाई शेळके, वसंत कानेटकर,ना.धो महानोर,संयुक्त महाराष्ट्रे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण* असे किती तरी महामहोपाध्याय यांचे प्राथमिक शिक्षण मराठी शाळेत झाले आणि त्यांनी आपल्या भाषेचा सन्मान केला. खऱ्याअर्थाने या मंडळींच मराठी भाषेवर प्रेम होतं यांनी मराठी भाषेसाठी खूप खस्ता खाल्ल्यात. आज मराठी शाळा जवळपास बंद झाल्यात मराठी शाळा सुरू कार्यरत राहण्यासाठी कोणीही पुढाकार घेतला नाही.म्हणून इंग्रजी शाळेचे पिकं आले.या इंग्रजी शाळेवर सरकारच नियंत्रण आहे का?कोणत्या कायद्याच्या अनुषंगाने या शाळा चालतात.कोणत्या शासकीय नियमानुसार या शाळा सुरू आहे.स्वात:च्याच नियमा़चा आराखडा तयार करून स्वतःच्याच नियमांनी या इंग्रजी शाळा सुरू आहेत.वारेमाप फी असुन ही पालक मुलांना इंग्रजी शाळेतच पाठवतात.याचा अर्थात मराठी भाषा आता फक्त बोलण्यापुर्तीच मर्यादित राहिली का?अस असेल तर मराठी भाषेबरोबर मराठी माणूस ही संपेल.तेव्हा असं होऊन यासाठी मराठी शाळाही सुरू होणे गरजेचे आहे.शिवाय मराठी विषय हा सक्तीने शिकवला गेलाच पाहिजे.शिवाय नामांकित ख्यातनाम साहित्यिकांनी तळागाळातील छोट्या मोठ साहित्यिकांना लहान लेखकांनाही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावण्यासाठी सोबत घ्यायला हवे. मराठी भाषेसाठी सर्वं पक्षीय नेते जर एकत्र येत नसतील तर छोटे मोठे नावाजलेल न नावाजलेले साहित्यिकांनी एकत्र येवून आपली ताकद वाढवायला हवी.हि ताकद जर एकत्र आली आणि यातून एखाद्या किरकोळ छोट्या साहित्यिकाने जर मोठा आवाज काढला तर तो आवाज सरकारदरबारी पोहोचल्यावर काहीतरी परिवर्तन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. साहित्य संमेलनासाठी फक्त शासकीय निधी घेऊन तोंडावर बोट धरून किती दिवस गप्प बसणार काहीतरी निर्णय व्हायला हवा तरचं आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळू शकेल.स्वताला मोठे साहित्यिक म्हणवून मंचावर हारतूरे घेऊन मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावण्याचे भाषणं ठोकून नाव मोठ लक्षणं खोटं असं म्हणण्याची वेळ यायला नको म्हणजे झाल.वरिष्ठ साहित्यिकांनी सर्वं बाबींची पूर्तता करून ही शासनदरबारी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नाही.महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या बाबतीत असे का घडावे याच कोडं अद्यापतरी उलगडलेलं नाही.किंबहूना महाराष्ट्रातील एकही आमदार
खासदारांनी एकत्र येऊन मराठी भाषेचा विचार केला नाही. खरचं आता गरज आहे ती सर्व राजकीय नेत्यांनी एकत्र येऊन मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची.फक्त मराठी भाषेसाठी मतभेद विसरून जर कृती केली तर मराठी भाषेवर खूप उपकार होतील नाही.मराठी भाषेवरील प्रेम हे बेगडी आहे असंच म्हणावं लागेल.
*संजय धनगव्हाळ*
*(अर्थात कुसुमाई)*
९४२२८९२६१८
९५७९११३५४७