You are currently viewing आभाळ..

आभाळ..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी मुबारक उमरानी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*आभाळ…*

 

आंधळे आभाळ

दळत राहिले

पाऊस पाण्यात

आभाळ पाहिले

 

कुजबूज चाले

शिवारी पिकात

पाऊस शिरतो

पिकाच्या नाकात

 

डोंगर कोसळे

विरून पाण्यात

आकांत वीजेचा

थेंबाच्या गाण्यात

 

श्वासाचं कोंदण

पापणी पंखात

बिजली आसूडी

जळे घर वात

 

अंधारल्या राती

उंबरा थरारे

भयभीत वारे

पाऊल थरारे

 

चिखल गाळात

अस्वस्थ तो चांद

माळून चिखल

रडे आता बांध

 

गाडीचे चकार

रुतले गाळात

अश्वत्थामी व्रण

किसान भाळात

 

मुबारक उमराणी

सांगली

प्रतिक्रिया व्यक्त करा