मुंबई :
कवयित्री, लेखिका, कथाकार श्रीमती कल्पना दिलीप मापूसकर यांच्या साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना जेष्ठ साहित्यिका प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार २०२४ सालचा वर्ल्ड वीजन टाईम्सचे संस्थापक प्राध्यापक नागेश हुलावळे यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आला. २५ ऑगस्टच्या नॅशनल लायब्ररी बांद्रा येथील कार्यक्रमात अध्यक्ष मान्यवर बाळासाहेब तोरस्कर, लेखक कवि डॉ खंडू माळवे मुंबई, पदश्री जी डी यादव, भानुदास केसरे, प्रमोद महाडीक, डॉ सुकृत खांडेकर, राजेश कांबळे, डॉ. नॅन्सी अल्बुकर्क, रामकृष्ण कोळवणकर, डॉ. रेडिक एंजल्स आदी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. रमेश मारुती पाटील लेखक कोल्हापूर, प्रमोद सुर्यवंशी मुंबई, योगेश हरणे पुणे व आयोजक समिती सर्व सदस्य उपस्थीत होते.
आज सात वर्ष सतत साहित्य सेवेत रुजू असलेल्या मीरा रोड येथील जेष्ठ साहित्यिका म्हणून यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार बहाल करण्यात आला. वृत्तपत्रातील त्यांचे लेखन सामाजिक बांधिलकी जपणारे आहे; तसेच समाजातील विकृत घटनांवर ताशेरे ओढणारे असते. वृद्धाश्रम, हुंडा, स्त्रीभ्रूण हत्या, महागाई, डिप्रेशन, वारांगना, लोकशाही, बलात्कार, गरिबी, बालकामगार, बेरोजगार अश्या विषयावर त्यांनी आपल्या लेख, कवितां मधून विषयाच्या गांभीर्याला वाचा फोडली आहे. त्यांचा “कल्पदीप” हा काव्यसंग्रह हा याचच एक उत्तम उदाहरण आहे. लय भारी प्रॉडक्शन मार्फत त्यांचा “रॉकेल” हा लघुपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यांना अनेक राज्यस्तरीय स्पर्धांमधून सन्मानचीन्हाने सन्मानित केले गेले आहे.