You are currently viewing सावंतवाडीत “संकल्प लेझर शोल्डरिंग” दालनाचे युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन

सावंतवाडीत “संकल्प लेझर शोल्डरिंग” दालनाचे युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन

सावंतवाडी :

 

सावंतवाडी शहरात सोन्या-चांदीचे तुटलेले दागिने जोडण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या “संकल्प लेझर शोल्डरिंग” या दालनाचे युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी जास्तीत जास्त मराठी उद्योजकांनी पुढे यावे आणि या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशा शुभेच्छा भोसले यांनी संकल्प शोल्डरिंग चे प्रमुख सागर खैरे यांना दिल्या.

गडहिंग्लज येथील सागर खैरे यांच्या माध्यमातून सावंतवाडी पांजरवाडा येथील स्वामी समर्थ अपार्टमेंट मध्ये हे दालन सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी सोन्या चांदीचे तसेच अन्य कोणत्याही धातूचे दागिने किंवा वस्तू जोडून देण्यात येणार आहे हे काम आधुनिक यंत्रांच्या माध्यमातून होणार आहे. दरम्यान या दालनाचे उद्घाटन लखमराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा