You are currently viewing ग्रुप ग्रामपंचायत सडुरे शिराळे च्या सदस्या सौ विशाखा नवलराज काळे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ प्रमाणपत्र देऊन ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांचे वतीने जाहीर सत्कार

ग्रुप ग्रामपंचायत सडुरे शिराळे च्या सदस्या सौ विशाखा नवलराज काळे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ प्रमाणपत्र देऊन ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांचे वतीने जाहीर सत्कार

*ग्रुप ग्रामपंचायत सडुरे शिराळे च्या सदस्या सौ विशाखा नवलराज काळे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ प्रमाणपत्र देऊन ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांचे वतीने जाहीर सत्कार.*

*मुख्यमंत्री आपली लाडकी बहीण योजनेचे ऑफलाईन ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी केलेल्या सहकर्या बद्दल करण्यात आला विशेष सन्मान.*

*वैभववाडी-*

आपली लाडकी बहीण योजनेचे ऑफलाईन ऑनलाइन फॉर्म १००% भरणा करण्यासाठी शासकीय कर्मचारी अंगणवाडी सेविका यांनी उत्कृष्ट काम केले त्याबद्दल त्यांचा ग्रामपंचायती वतीने सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे राज्यातून आलेल्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून जनतेने आपल्याला निवडून दिले आणि त्यांच आपल्याला काम केलं पाहिजे या भावनेने सडूरे शिराळे ग्रामपंचायत सदस्या विशाखा नवलराज काळे यांनी श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने संपूर्ण तालुक्यातील महिलांचे ऑनलाईन फॉर्म मोफत भरण्यासाठी सहकार्य केले त्यामध्ये सडूरे शिराळे गावातील जास्तीत जास्त महिलांचे फॉर्म भरून 100% लाभार्थी पूर्ण करण्यासाठी सामाजिक स्तरावरून हातभार लावल्याबद्दल ग्रामपंचायतीच्या गावातील ग्रामस्थांच्या वतीने वतीने सौ विशाखा नवलराज काळे यांचा जाहीर शाल श्रीफळ प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. श्री माऊली चारिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने राबवण्यात आलेल्या उपक्रमाबद्दल तालुक्यात सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. या सन्मानाच्या वेळी ग्रुप ग्रामपंचायत सडुरे शिराळे चे सरपंच दीपक चव्हाण, उपसरपंच आनंद जंगम, ग्रामपंचायत सदस्य तथा श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री नवलराज काळे, विलास जंगम, सौ विशाखा काळे, रेश्मा बाणे, प्रियांका पाटील, दीक्षा रावराणे, ग्रामसेवक प्रशांत जाधव,रवळनाथ सोसायटी अध्यक्ष संतोष भोसले, तंटामुक्ती गाव समिती अध्यक्ष विठ्ठल काटे, माजी सरपंच विजय रावराणे,शिराळे भाजपा बूथ अध्यक्ष विजय पाटील, सडूरे भाजप बूथ सत्यवान डांगे, मनोहर बोडेकर, बबन रावराणे, माजी उपसरपंच संतोष पाटील, रमाकांत रावराणे, मालती रावराणे, दत्ताराम रावराणे, शुभांगी बोडेकर, आकाराम बोडेकर, भगवान बोडेकर, महेश डेळेकर, अंकिता डेळेकर, रसिका पाटील, चंद्रकांत डेळेकर, संदीप धामणे,प्रभाकर राणे, माजी पोलीस पाटील प्रकाश रावराणे, उदय रहाटे, हरिश्चंद्र माने,जिल्हा परिषद शाळा शिराळे चे मुख्याध्यापक विनोद करपे व इतर शिक्षक इतर सर्व ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी व ग्रामपंचायत कर्मचारी सुनील राऊत, अशोक पाटील, कोतवाल मोहन जंगम व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

_____________________________
*संवाद मीडिया*

*मंगलमूर्ती मोरया*
*गणपती बाप्पा मोरया..!!*🙏🙏

*_गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या गणेश भक्तांचं माई ह्युंदाईच्या वतीने मनःपूर्वक स्वागत…!!_*

*_आपल्या ह्युंदाई कारच्या देखभालीसाठी आम्ही आहोत 24×7 आपल्या सेवेत.._* 🚗🚕

*_कोणत्याही प्रकारच्या इमर्जन्सी सर्व्हिसेससाठी कॉल करा…_*

*MAI HYUNDAI*

*अविरत सेवेची 25 वर्षे*

*कुडाळ*
📲 7410006037

*कणकवली*
📲 8956130166

*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा