*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी प्रा.सत्यवान घाडी लिखित अप्रतिम गवळण*
*गवळण*
“””””””””””””
*प्रेमात माधव वेडा झाला*
**********************
तुझ्या प्रेमाचा राधे जगी उदोउदो झाला
राधे राधे तुझ्या प्रेमात माधव वेडा झाला।।धृ।।
तुची गुणवंती राधा तुची रूप सुंदरी
परी हृदयी बसविला सावळा श्रीहरी
तुझ्या रुपा गुणांनी मोहन मोहित झाला
राधे राधे तुझ्या प्रेमात माधव वेडा झाला।।धृ।।१।।
गोरा गोरा रंग तुझा किती वर्णावा तरी
विहारत असता होई वनराणी बावरी
सांगना राधे काय करील मुरलीवाला
राधे राधे तुझ्या प्रेमात माधव वेडा झाला।।धृ।।२।।
गुणांची तू गुणवंती नाही तोड या संसारी
म्हणूनी भाळला तुझ्यावरी देव मुरारी
हृदय देऊन तुला शाम मोकळा झाला
राधे राधे तुझ्या प्रेमात माधव वेडा झाला।।धृ।।३।।
गुरे राखी माळावरी सखा कृष्ण गोपाळ
वाट पाहिलीस राधे त्याची शाम सकाळ
कसा येण्या परतुनी उशीर त्याला झाला?
राधे राधे तुझ्या प्रेमात माधव वेडा झाला।।धृ।।४।।
अपेक्षा कशाची राधे ठेवली नाही मनी
नि: स्वार्थ प्रेम तुझे जडे देवकी नंदनी
प्रेमभक्ती जाणता तुझी कृष्ण फिदा झाला
राधे राधे तुझ्या प्रेमात माधव वेडा झाला।।धृ।।५।।
🌺 *सर्वांना गोकुळ अष्टमीच्या मंगलमय शुभेच्छा!*🌸
**********************************
*रचनाकार:-* प्रा.सत्यवान शांताराम घाडी.
*गांव:-* किंजवडे, घाडीवाडी, देवगड, सिंधुदुर्ग.
*दिवा:-* ठाणे
🦚🌸🐇🌳🌺🦚🌈🌳🦜🌺🦚