You are currently viewing महिला सक्षमीकरणासाठी चेंबूरमध्ये भव्य महिला रोजगार मेळावा

महिला सक्षमीकरणासाठी चेंबूरमध्ये भव्य महिला रोजगार मेळावा

*मा. आमदार तुकाराम काते यांचा शिव उद्योग संघटनेसह पुढाकार*

 

*नीलम गोऱ्हे, राहुल शेवाळे यांची विशेष उपस्थिती*

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

माजी आमदार तुकाराम काते यांनी २५ ऑगस्ट रोजी शिव उद्योग संघटनेसह संयुक्त विद्यमाने चेंबूर विधानसभेमध्ये भव्य महिला रोजगार मेळावा आयोजित केला होता. सदर मेळाव्याचा उद्देश रोजगाराच्या संधी, मार्गदर्शन आणि प्रेरणा देऊन महिलांना सक्षम करणे हा होता. कार्यक्रमासाठी मा. उपसभापती, विधान परिषद नीलम गोऱ्हे, मा. खासदार राहुल शेवाळे, मा. आमदार तुकाराम काते, मा. नगरसेविका समृद्धी काते, विभागप्रमुख अविनाश राणे, तुषार काते, विधानसभा प्रमुख रवींद्र महाडिक आणि म. वि. संघटक सुनीता वैती यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

मेळाव्याला ५०० हून अधिक महिलांनी विविध व्यवसायांची माहिती घेण्यासाठी हजेरी लावली. मा. आमदार तुकाराम काते, विभागप्रमुख अविनाश राणे, मा. खासदार राहुल शेवाळे आणि मा. उपसभापती, विधान परिषद नीलम गोऱ्हे यांनी आपले मौल्यवान विचार सभागृहात मांडले आणि उपस्थित उदयोन्मुख व्यावसायिकांना प्रोत्साहित केले.

शिव उद्योग संघटनेतर्फे अध्यक्ष दीपक काळीद, सरचिटणीस व विपणन आणि मीडिया समिती प्रमुख प्रकाश ओहळे, उपाध्यक्ष व कृषी उत्पादन समिती प्रमुख गोकुळ लगड, राज्य कार्यकारिणी सदस्य व परिवहन समिती प्रमुख भास्कर चव्हाण, शिक्षण समिती प्रमुख प्रा. महेश कुलकर्णी, भोजन समिती प्रमुख संतोष आडविलकर, रोजगार समिती प्रमुख निरंजन मोहिते, योग समिती प्रमुख उमेश गोरुले, आरोग्य समिती प्रमुख रीमा काकडे, प्रॉपर्टी समिती प्रमुख भालचंद्र डफळ आणि इव्हेंट समिती प्रमुख गुरुदत्त वाकदेकर यांनी आपआपल्या समितीकडून पुरविण्यात येत असलेल्या विविध व्यवसायांचे मार्गदर्शन प्रदान केले.

महिला रोजगार मेळाव्याचे आयोजन खूपच नियोजनबद्ध पद्घतीने करण्यात आले. त्यामुळे महिलांना त्यांचे उज्वल भवितव्य घडविण्यासाठी आणि स्वतःच्या आयुष्याचा तसेच परिवाराचा सांभाळ करण्यास सक्षम केले. सदर मेळाव्यातून महिला सक्षमीकरण आणि रोजगारासाठी सामूहिक बांधिलकी दिसून आली.

मेळाव्यामध्ये भोजन समितीच्या माध्यमातून चेंबूर विधानसभेतील पहिले सेंट्रल किचन प्रिती बारगोडे यांच्या सहयोगाने सुरु करण्यात आले. त्याचे प्रातिनिधिक उद्घाटन मेळाव्यात करण्यात आले. तसेच प्रा. किशोर घोडके यांच्या ऐम ट्युटोरिअल्स यांच्या यूपीएससीच्या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

सदर मेळावा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शिवसैनिकांनी अथक परिश्रम केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भास्कर चव्हाण तर आभार प्रदर्शन रवींद्र महाडिक यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा