You are currently viewing मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण ही दुर्दैवी आणि क्लेशदायक घटना – ‌ इर्शाद शेख

मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण ही दुर्दैवी आणि क्लेशदायक घटना – ‌ इर्शाद शेख

मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण ही दुर्दैवी आणि क्लेशदायक घटना – ‌ इर्शाद शेख

सिंधुदुर्ग

मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण ही फार दुर्दैवी आणि क्लेशदायक अशी घटना आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्याची अस्मिता नाहीतर महाराष्ट्राची आणि संपूर्ण देशाची अस्मिता आहे आणि या अस्मितेचा अशा प्रकारे अपमान करणे ही फार दुर्दैवी गोष्ट आहे. डिसेंबर 2023 मध्ये या पुतळ्याच बांधकाम झालं होते. आणि आठ महिन्याच्या आत हा पुतळा कोसळला त्यामुळे याचे बांधकाम किती तकलादू होते हे दिसून येते. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे, ‌ अशी मागणी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विशाल शेख यांनी केली आहे. आज आपण पाहतो शिवाजी महाराजांवर आस्था नसणारे लोक शिवाजी महाराजांचा आपल्या फायद्यासाठी आपल्या चमकेगिरीसाठी इव्हेंट करतात आणि तो इव्हेंट करून आपली पोळी भाजून घेतात. अशा लोकांना शिवाजी महाराजांबद्दल कुठल्याही प्रकारची आस्था नसते असे लोक फक्त शिवाजी महाराजांचा उपयोग करून घेतात हे आपल्याला या घटनेतून दिसून आलेल आहे म्हणून जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई केली पाहिजे शिवाजी महाराजांचा पुतळा अशा पद्धतीने कोसळणे हे माझ्यासारख्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेमी व्यक्तीला फार क्लेश करणार आहे आणि अशा प्रकारची दुर्दैवी घटना भविष्यात घडूनये याची काळजी सरकारने घेतली पाहिजे ‌अशी मागणी इरशाद शेख यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा