*वीज ग्राहक संघटना सावंतवाडीचे आयोजन*
सावंतवाडी :
सावंतवाडी तालुक्यातील वीज ग्राहकांची बैठक सावंतवाडी नगरपालिकेच्या पहिल्या मजल्यावरील पत्रकार कक्षाच्या शेजारील हॉलमध्ये बुधवार दिनांक २८ ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे. यावेळी तालुक्यातील वीज ग्राहक व वीज ग्राहक संघटना पदाधिकारी सदस्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन वीज ग्राहक संघटना तालुकाध्यक्ष संजय लाड यांनी केले आहे.
येत्या आठवडाभरानंतर कोकणातील महत्त्वाचा सण असलेला गणेशोत्सव तोंडावर आलेला असून वारा पाऊस नसताना देखील सावंतवाडी तालुक्यातच नव्हे तर शहरात देखील दिवसातून दहा वेळा वीज गायब होण्याचे प्रकार वाढले आहेत. महावितरण कडून वीज ग्राहकांना अजूनही योग्य अशी सेवा पुरवली जात नसून भरमसाठ वीज बिले मात्र वसूल केली जात आहेत. महावितरण वर वीज ग्राहकांचा चांगली सेवा मिळविण्यासाठी दबाव वाढविणे गरजेचे असून ग्राहकांनी एकत्र आल्यासच ते शक्य आहे. गणेशोत्सव काळात तालुक्यात महावितरणकडून योग्य ती उपाययोजना होऊन उत्तम सेवा मिळण्यासाठी उपाययोजना करण्याकरिता सदरची बैठक आयोजित केली आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त वीज ग्राहकांनी आपल्या हक्कासाठी सदर बैठकीला उपस्थित रहावे असे आवाहन वीज ग्राहक संघटना सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजय लाड यांनी केले आहे.