You are currently viewing लज्जाहीन सर्वत्र हीन

लज्जाहीन सर्वत्र हीन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे सन्मा. सदस्य कवी सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*लज्जाहीन सर्वत्र हीन*

 

एकदा सोडून गेली कधी लज्जा

परत वरित नाही लज्जा जाण

लज्जेवर विश्व भार विकासाचा

न्याय वा नीती न करी लज्जा दान ||१||

 

लज्जा नसे वस्त्रापुरती जगी या

दिगंबर होती कुणी लज्जावान

लज्जा नसे बाह्य रुबाबात खास

लज्जा मनाचा सुसंस्कार तो मान ||२||

 

लज्जा लक्ष्मीहून आहे खडतर

मायेपोटी लक्ष्मी परत येईलही

परि लज्जा ना येत अंतापर्यंत

भिकारी लक्ष्मी जवळ असूनही ||३||

 

सावध मानवा मानवतेसाठी

लज्जाच ओळख आहे मानवाची

लज्जेला नाहीच जात धर्म काही

स्वतःसवे राखावी लाज मानवाची ||४||

 

कवी :- श्री सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे.

फणसखोल, आसोली, ता.- वेंगुर्ला,

जि.- सिंधुदुर्ग, राज्य :- महाराष्ट्र.

प्रतिक्रिया व्यक्त करा