You are currently viewing विश्व हिंदु परिषद आयोजित नेत्र चिकित्सा शिबिराला वेंगुर्लेत उस्फूर्त प्रतिसाद

विश्व हिंदु परिषद आयोजित नेत्र चिकित्सा शिबिराला वेंगुर्लेत उस्फूर्त प्रतिसाद

*विश्व हिंदु परिषद आयोजित नेत्र चिकित्सा शिबिराला वेंगुर्लेत उस्फूर्त प्रतिसाद*

*१५० नेत्र रुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ*

*शिबिरातील नेत्र रुग्णांची होणार मुंबईत मोफत शस्त्रक्रिया*

विश्व हिंदु परिषदेच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने वेंगुर्लेत भटवाडी येथील शिरसाठ यांच्या निवासस्थानी मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .
यावेळी मुंबई स्थीत डाॅक्टर निरव दिलीप रायचुरा व डाॅक्टर दृष्टी निरव रायचुरा यांनी नेत्र रुग्णांची तपासणी केली , तसेच या तपासणीत ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया करणे अत्यावश्यक आहे अशा रुग्णांवर मुंबईत मोफत शस्त्रक्रिया करणार असल्याचे या शिबीराचे आयोजक डाॅक्टर राजन शिरसाठ यांनी सांगितले .
शिबिराचे उद्घाटन नवी मुंबईचे सहाय्यक आयुक्त जयंत जावडेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले .यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , वि.हि.प.चे जिल्हा सेवा प्रमुख नंदकुमार आरोलकर , सुनिल नांदोसकर , वि.हि.प.चे नितीन पटेल , डाॅक्टर माधुरी शिरसाठ , भाजप वैद्यकीय आघाडीचे डाॅ.दर्शेश पेठे , किरात चे मराठे , शुभांगी ऑप्टीक्स चे निलेश हरमलकर व सचिन हरमलकर , रविंद्र शिरसाठ इत्यादी मान्यवर उपस्थित होते .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत पारकर यांनी केले व आभार प्रदर्शन डाॅ.राजन शिरसाठ यांनी केल . यावेळी नगरसेवक प्रशांत आपटे , वि.ह.प.चे गिरीश फाटक , शिरसाठ मिठाई चे बाळा शिरसाठ , गो – सेवा आयोगाचे दिपक भगत , किर्तीमंगल भगत , रा.स्व.संघाचे नित्यानंद आठलेकर , विशाल सावळ , उद्योजक दिपक माडकर , शिवदत्त सावंत इत्यादी मान्यवरांनी शिबिरास भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले .

_____________________________
*संवाद मीडिया*

🏠🏠🏠🏠🏠🏠🏠

*🏠 SK 🏠*
*VASTU*
*CONSULTANT*

*🏘️🏘️ SK VASTU CONSULTANCY* 🏘️🏘️

*🔸We solve all problems related to Vastu*

*🔹We suggest solutions for Vastu Dosha*

*🔸We solve all Vastu Kundli related problems*

*_Vastu specialist in house, hotels, mall, school, college, showrooms, shop, factory, hospital_*🏥🏬🏘️🏢🏣

*Contact details:-*
📲9892009443
📲9930787451

*Advt 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा