*रेल कामगारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय; क्षेत्रीय रेल प्रबंधक रवींद्र कांबळे*
रत्नागिरी :
रेल कामगार सेना अध्यक्ष तथा माजी खासदार शिवसेना सचिव विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली रेल कामगारांच्या न्याय मागण्यासंदर्भात रत्नागिरी येथे कोकण रेल्वेच्या क्षेत्रीय प्रबंधक कार्यालयात पार पडली.
यावेळी रेल कामगार सेना सरचिटणीस दिवाकर देव, कार्याध्यक्ष संजय जोशी, कोकण रेल्वे सरचिटणीस राजू सुरती तसेच अध्यक्ष शशी नायर, संयुक्त सरचिटणीस मिनाज झारी, खजिनदार विश्वास राणे, गजानन गायकर, दत्ता तेलंगे,चंदन गुरव,गणपत दळवी,अशोक शिरोडकर, कौस्तुभ ढेकणे,तेजस थिटे,संतोष कुंभार, रविंद्र गुजर,रवि सावर्डेकर, राकेश सिन्हा, गणेश चाळके, क्षेत्रिय रेल प्रबंधक रविंद्र कांबळे उपस्थित होते.
या बैठकीत MACPS ची ऑर्डर काढणे, स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीमध्ये प्राधान्य देणे, पॉईंट्समन लोकांची ट्रान्सफर ऑर्डर काढणे, चुकीच्या पद्धतीने दिलेल्या चार्जेशीट मागे घेण्यात याव्यात, रनिंग स्टाफला वॉकी टॉकी लवकरात लवकर पुरवणे, रत्नागिरी रिजन मधे चालवण्यात येणाऱ्या मेमू साठी लोकल पायलटना रिलीफ द्यावा किंवा सहाय्यक लोकल पायलट द्यावा यावर चर्चा झाली.
या सर्व मुद्द्यांवर क्षेत्रिय रेल प्रबंधक रविंद्र कांबळे यांनी तत्वतः मान्यता देत सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले.