*दशावतार कलाकारांच्या मुलांचा गुणगौरव सोहळा*
*भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्याकडून कौतुक, कलाकारांचाही केला सन्मान!*
सावंतवाडी
दशावतार ही कला म्हणजे कोकणच्या सांस्कृतिक क्षेत्राचा कणा मानला जातो. “रात्रीचा राजा आणि सकाळी कपाळावर बोजा” अशी एक म्हण पूर्वी कोकणात रूढ होती. याचे कारण म्हणजे या लोककलेला राजाश्रय नव्हता. मात्र अलीकडे भारतीय जनता पार्टीने दशावतार कलेला राजाश्रय मिळावा यासाठी मोलाची कामगिरी केली आहे. पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि खासदार नारायणराव राणे यांनी या कार्यात भरीव सहयोग आजवर अनेकदा दिलेला आहे.
या कलेचे जतन करण्यासाठी अनेक कोकणी कलाकारांनी आपले आयुष्य खर्च केले आहे. अशा दशावतारी कलाकारांच्या मुलांचा गुण गौरव सोहळा दशावतारी कलाकार बहुउद्देशीय संघ सावंतवाडी यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे श्रीदेवी माऊली मंदिर इन्सुली येथे आज आयोजित करण्यात आला होता. भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी वेळोवेळी दशावतारी कलाकारांच्या पाठीशी उभे राहून सर्वतोपरी मदत केली आहे.त्या जाणीवेतून सावंतवाडी तालुका दशावतारी कलाकार बहुउद्देशीय संघातर्फे भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांना या कार्यक्रमासाठी सन्मानपूर्वक आमंत्रित करण्यात आलेले होते.
दहावी बारावी परीक्षेत यश मिळवलेल्या अनेक मुलांचा गुणगौरव सोहळा यावेळी करण्यात आला. सायंकाळी सावंतवाडी तालुक्यातील निवडक कलाकारांच्या संचात दशावतारी नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. दशावतारी कलेचा अभिमान आणि वारसा पुढील पिढीनेही धारण करायला हवा, यासाठी या मुलांच्या समोर दशावतारी कलाकार आपल्या निवडक कलाकारांच्या संचात हा नाट्यप्रयोग साजरा केला होता. विशाल परब यांनी या आगळ्या कल्पनेचे कौतुक करत दशावतार कलाकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत अभिनंदन केले.
यावेळी अड.अनिल निरवडेकर,
माऊली देवस्थान कमिटी इन्सुली माजी अध्यक्ष श्री.कृष्णा सावंत
जेष्ठ दशावतार कलावंत श्री.श्याम निवेलकर
तंटामुक्ती अध्यक्ष इन्सुली श्री.सदानंद कोलगावकर
माऊली देवस्थान कमिटी विद्यमान अध्यक्ष श्री.मनोहर गावकर
श्री.नारायण राणे निगुडे सामाजिक कार्यकर्ते
श्री.महेश धुरी
माऊली देवी इन्सुली देवस्थान सर्व मानकरी श्री.परब,श्री.गावडे श्री.धुरी श्री.गावकर
इन्सुली वि.वि.कार्यकारी सोसायटी श्री.आनंद राणे हे मान्यवर उपस्थित होते.
______________________________
*संवाद मिडिया*
👗👗👗👗👗👗👗👗👗
*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*
*𝙼𝚊𝚔𝚎 𝚢𝚘𝚞𝚛 𝙿𝚊𝚜𝚜𝚒𝚘𝚗 𝚈𝚘𝚞𝚛 𝙿𝚛𝚘𝚏𝚎𝚜𝚜𝚒𝚘𝚗…*
*𝙲𝚊𝚛𝚎𝚎𝚛 𝚒𝚗 𝙵𝚊𝚜𝚑𝚒𝚘𝚗 𝙳𝚎𝚜𝚒𝚐𝚗𝚒𝚗𝚐…*
👗👗👗👗👗👗👗👗👗
*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*
*𝙳𝚒𝚙𝚕𝚘𝚖𝚊 𝚒𝚗 𝚃𝚎𝚡𝚝𝚒𝚕𝚎 & Fashion Designing*
(SNDT विद्यापीठ, मुंबई मान्यताप्राप्त अभ्यासक्रम)
*🔸कालावधी :- २ वर्षे*
*🔸 प्रथम वर्षाकरीता प्रवेश पात्रता :-कोणत्याही शाखेची १२ वी परीक्षा उत्तीर्ण.*
🔸 *वैशिष्ट्ये :-*
✅ तज्ञ व अनुभवी अध्यापक वर्ग.
✅ अद्ययावत फॅशन व टेक्स्टाईल लॅब.
✅ फॅशन इंडस्ट्रीतील नामांकित कंपन्यांमध्ये क्षेत्र भेटी.
✅ सर्व सोयींनी युक्त वसतिगृह व मेस सुविधा उपलब्ध.
✅ डिप्लोमा नंतर डिग्री अभ्यासक्रमास प्रवेशास पात्र.
✅ नामांकित फॅशन कंपन्या मध्ये नोकरीच्या अधिक संधी अथवा स्वतःचा स्टार्टअप व्यवसायास उपयुक्त.
*संपर्क:*
*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय*
*साखरतर रोड, शिरगाव, रत्नागिरी*,
*अधिक माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क करावा:*
*📱 74998 21369*
कृपया पुढील Google form भरावा :
https://forms.gle/k5HygsNxeUTTMJmb7
*Advt
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*