मुंबई:
मुंबई मधील मध्य रेल्वेच्या भांडुप स्टेशनवर एक रेल्वे प्रवासी मायनर अटॅक येऊन खाली कोसळला. त्याचवेळी रेल्वेने प्रवास करत असलेले आरपीएफ मुंबईचे श्री.नितीन पाटील यांच्या ते निदर्शनास आले. श्री.नितीन पाटील यांनी तात्काळ त्या प्रवाशाची चौकशी करत त्यांना सीपीआर देऊन त्यांचे प्राण वाचविले. त्वरित स्टेशन मास्तरना खबर देत अँब्युलन्सची सोय करत प्रवाशी रुग्णाला भांडुपच्या अग्रवाल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले.
श्री.नितीन पाटील यांनी दाखविलेली तत्परता आणि धाडस यामुळे मायनर अटॅक आलेल्या एका प्रवाशाचे प्राण वाचले. त्यामुळे सर्व स्तरावरून त्यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे. श्री.नितीन पाटील यांनी दाखविलेली तत्परता, माणुसकी म्हणजे रस्त्यावर अपघात ग्रस्त होऊन पडलेल्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करून जाणाऱ्या लोकांसाठी धडा आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.