You are currently viewing पाऊस धो- धो- रडला !

पाऊस धो- धो- रडला !

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*पाऊस धो- धो- रडला !*

 

इतुका तो कोसळला नाही

तितके कवी त्यावर बरसले

तो मौनातच वरती थांबला

त्याचे डोळे शब्दांनी पाणावले

 

अरे किती प्रेम करता!

हरएक ऋतुत आभाळ ढगाळता

मीही इतका भरून येत नाही

तितकं तुम्ही भरून येता

 

फसलेल्या प्रेमकहाण्या तुम्ही

माझ्या नावावर खपवता

ओलेत्या अंगावर डोळा तुमचा

प्रणय पावसाचा उभा करता

 

छत्रीच्या आड तुमच्या गंमती

मी येण्याआधीच छत्री उघडता

प्रणय तुझा माझा नव्हे!तो तर

पावसाचा!असं खोटं लिहीता

 

या क्षणांची शपथ तुम्हांला

प्रेमाला इतकी दृष्ट लावू नका

धुंदावलेल्या या घडीला

मला एकटं सोडून! जाऊ नका !

 

पाऊस धो-धो रडला..

कवींनो मला सोडून..जाऊ नका!

तुमच्याशिवाय मला आहे तरी कोण

एकटं मला सोडून जाऊ नका..!!

 

बाबा ठाकूर धन्यवाद

प्रतिक्रिया व्यक्त करा