You are currently viewing हास्य तुझ्या गालावर

हास्य तुझ्या गालावर

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या कवयित्री भारती वाघमारे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*हास्य तुझ्या गालावर*

 

गोड गोजिरी लाज लाजरी

नजरेचा मारते तीर .

खूप सुंदर दिसते

जेव्हा असतो राग नाकावर .

तेव्हा असते हास्य तुझ्या चेहऱ्यावर. ….//१//

 

सुमधुर गाते गाणी

कंठात लागला सुर .

गुबरे गुबरे गाल तुझे

पडते खळी गालावर .

तेव्हा असते हास्य तुझ्या चेहऱ्यावर …..//२//

 

ठुमकत चालते चाल

घेऊन कमरेवर घागर .

मनाशी जोडले नाते

नजरेवर पडली नजर .

तेव्हा असते हास्य तुझ्या चेहऱ्यावर …..//३//

 

रिमझिम पावसाच्या सरीत

थेंब पडले डोक्यावर .

पाण्याचा आला ओघळ

येऊन थांबला ओठावर .

तेव्हा असते हास्य तुझ्या चेहऱ्यावर …..//४//

 

साखरेसारखी गोडी

आहे तुझ्या जिभेवर .

जपून आपुलकीची नाती

ठेवते हात हातावर .

तेव्हा असते हास्य तुझ्या गालावर…..//५//

 

 

सौ भारती वसंत वाघमारे

राहणार मंचर

तालुका आंबेगाव

जिल्हा पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा