You are currently viewing इनरव्हिल क्लब ऑफ डहाणू तर्फे के.एल.पोंदा.हायस्कूलच्या इयत्ता ७वीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप!

इनरव्हिल क्लब ऑफ डहाणू तर्फे के.एल.पोंदा.हायस्कूलच्या इयत्ता ७वीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप!

इनरव्हिल क्लब ऑफ डहाणू तर्फे के.एल.पोंदा.हायस्कूलच्या इयत्ता ७वीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप!*

डहाणू.विकासामा प्रतिनिधी :-

के.एल.पोंदा.हायस्कूल डहाणू जिल्हा पालघर येथे इयत्ता ७वी (ब)च्या वर्गातील एकूण ४३ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.अनुपमा जाधव(उपक्रमशील , आदर्श शिक्षिका)यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन, सूत्रसंचलन करण्यात आले.शालेय विद्यार्थ्यांना इतर सामाजिक संस्थांमार्फत काहीना काही लाभ मिळवून देण्यासाठी त्या सतत प्रयत्नशील असतात.त्यामुळे त्यांनी राबविलेले उपक्रम नक्कीच आनंददायी व फलदायी असतात.
अनुपमा जाधव यांनी स्वतः पुष्पगुच्छ तयार करुन, फुलांच्या बीया भेट देऊन उपस्थितांचे स्वागत केले .झाडे लावा झाडे जगवा, पर्यावरण संवर्धन हा संदेश स्वागतामधून देण्यात आला. मा.प्राचार्य श्री.सोपान इंगळे सर यांनी देखील या कार्यक्रमा बद्दल आनंद व्यक्त केला. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक साहित्याचा त्यांनी लाभ घेऊन अधिकाधिक चांगला अभ्यास त्यांनी करावा. सर नेहमीच चांगल्या उपक्रमांसाठी प्रोत्साहन देतात. त्यामुळेच आजचा कार्यक्रम यशस्वी!अॅड. संयुक्ता तामोरे यांनी देखील शाळेतील भुतकाळातील आठवणींना उजाळा देत, विद्यार्थ्यांनी पाढे पाठ करा.पालक मुलांसाठी कष्ट करतात.त्यामुळे भविष्यात तुम्हाला काय व्हायचे ते आतापासूनच ठरवा.खूप प्राविण्य मिळवा,शिक्षण पध्दतीत खूप बदल झाला आहे.त्यामुळे जास्तीत जास्त अभ्यास करा. या कार्यक्रमात इनरव्हिल क्लब ऑफ डहाणूच्या अध्यक्षा, सामाजिक कार्यकर्ती राजश्री अहिरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्व प्रथम इनरव्हिल क्लबची माहिती सांगून विदेशात देखील इनरव्हिल क्लबचे कार्य चांगले सुरु आहे.स्त्री शिक्षणाचे महत्त्व सांगितले.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले,यांच्या प्रेरणेने आम्ही भगिनी शिक्षण घेऊ शकलो. आज विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.त्यांचा आदर्श घेऊन आपण यशस्वी व्हावे. अशा शुभेच्छा दिल्या.उपस्थित अॅड. संयुक्ता तामोरे,यांची मुलं देखील मराठी माध्यमाच्या शाळेत शिकून वकील झाली आहेत. राजश्री अहिरे मॅडम यांचा मुलगा देखील याच शाळेत शिक्षण घेऊन डॉक्टर झाले आहेत.तसेच आनंदाची गोष्ट की,ते आज डॉक्टर आदित्य अहिरे हे रोटरी क्लब ऑफ डहाणूचे अध्यक्ष आहेत. अनुपमा जाधव मॅडम यांची देखील मुलं याच शाळेत शिकून मेकॅनिकल इंजिनिअर, एम बी ए.झालेली आहे. नोकरी व्यवसायात चांगले यशस्वी झाले आहेत. या उदाहरणावरून या सर्वांचा आदर्श विद्यार्थ्यांना नक्कीच वाटेल. यातून सांगण्याचा उद्देश की, मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलेली मुलं देखील चांगली प्रगती करु शकतात.या कार्यक्रमासाठी प्राचार्य श्री.सोपान इंगळे सर, पर्यवेक्षक श्री.सुनील मोरे सर, पर्यवेक्षिका सौ.मनिषा पटेल व राजश्री अहिरे,(इनरव्हिल क्लब ऑफ डहाणू अध्यक्ष) प्रांजली फाटक (सेक्रेटरी) पल्लवी अभ्यंकर (माजी अध्यक्ष इनरव्हिल क्लब)अॅड. संयुक्ता तामोरे , मीना वाजे सुरेखा भामरे, सदस्य उपस्थित होते.व विद्यार्थी वर्ग उपस्थितांचे आभार अनुपमा जाधव यांनी मानले शैक्षणिक साहित्या बरोबर विद्यार्थ्यांना चाॅकलेट देखील वाटप करण्यात आले. विद्यार्थी वर्ग आनंदीत झाले.

_____________________________
*संवाद मीडिया*

🏠🏠🏠🏠🏠🏠🏠

*🏠 SK 🏠*
*VASTU*
*CONSULTANT*

*🏘️🏘️ SK VASTU CONSULTANCY* 🏘️🏘️

*🔸We solve all problems related to Vastu*

*🔹We suggest solutions for Vastu Dosha*

*🔸We solve all Vastu Kundli related problems*

*_Vastu specialist in house, hotels, mall, school, college, showrooms, shop, factory, hospital_*🏥🏬🏘️🏢🏣

*Contact details:-*
📲9892009443
📲9930787451

*Advt 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा