You are currently viewing शिर्डीत भरणार व्हाॅईस ऑफ मिडियाचे राज्य अधिवेशन २०२४..!

शिर्डीत भरणार व्हाॅईस ऑफ मिडियाचे राज्य अधिवेशन २०२४..!

शिर्डीत भरणार व्हाॅईस ऑफ मिडियाचे राज्य अधिवेशन २०२४..!

सिंधुदुर्ग

पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी कार्यरत असलेल्या व्हाॅईस ऑफ मिडियाचे राज्य अधिवेशन २०२४ चे शिर्डी येथे आयोजन करण्यात आले आहे. ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान चालणार असलेल्या या राज्य अधिवेशन महाराष्ट्र राज्यातील विविध भागातील पत्रकारांची ओळख तसेच तज्ञ व ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि पत्रकारीता क्षेत्रातील विविध संधी याबाबत चर्चा अशा विविध पैलूंची रेलचेल आहे.

व्हाॅईस ऑफ मिडिया सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष परेश राऊत, कार्याध्यक्ष समीर म्हाडेश्वर, सल्लागार बी एन खरात व जिल्हा पदाधिकारी यांनी या संदर्भात माहिती दिली असून व्हाॅईस ऑफ मिडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या नेतृत्व मार्गदर्शनाखाली सर्व सदस्य पत्रकार बांधवांसाठी साईबाबांच्या शिर्डीत ही एक पर्वणी असल्याचेही सांगण्यात आले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा