You are currently viewing आला आला श्रावण

आला आला श्रावण

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.अनघा अनिल कुळकर्णी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*आला आला श्रावण*

 

आला आला श्रावण

घेऊन आनंदाचे क्षण

सृजनाचा तृप्तीचा महिना

ऋतुचक्राचा पाचवा महिना… . १

 

आला आला श्रावण

घेऊन सणांना आमंत्रण

चहू कडे फुलांचा गालिचा

भरला ओला गंध मातीचा… .. २

 

आला आला श्रावण

रांगोळ्यांनी सजले अंगण

इंद्रधनु अंबरी अवतरले

रानावनात मोर नाचले… … .. ३

 

असा लावण्य राज श्रावण

फुलले निसर्गाचे प्रांगण

डोलती हिरवी पाती आनंदात

चिंब भिजली धरा सुगंधात… … ४

 

सौ. अनघा अनिल कुळकर्णी

पुणे. 🙏

प्रतिक्रिया व्यक्त करा