वेंगुर्ला :
वेंगुर्ले नगर परिषदेतर्फे शहर मर्यादित पर्यावरणपूरक गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील विजेत्या प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे ५ हजार, ३ हजार व १ हजार रुपये अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांनी पर्यावरण संवर्धनाला चालना देणाऱ्या कल्पनांना प्रोत्साहन द्यावे. सजावट केवळ इको-फ्रेंडली सामग्रीपासून करावी. गणेश मूर्ती केवळ शाडू मातीची असावी. थर्माकोल व एकेरी वापराचे प्लास्टिक (सिंगल युज प्लास्टिक) वापरण्यास सक्त मनाई आहे. सजावटीसाठी प्लास्टिकचा वापर टाळावा.
सजावट व मूर्तीचे फोटो, व्हीडिओ १४ सप्टेंबरपर्यंत या लिंकवर वा ९४२१०४४८०० या क्रमांकावर पाठवावेत. मूर्तीचे व सजावटीचे फोटो सोशल मीडियावर वेंगुर्ले नगर परिषदेच्या अधिकृत फेसबूक साईटला टॅग करावे. नाव नोंदणीसाठी ९४२१०७४८०० या नंबरवर संपर्क साधावा. स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले आहे.