You are currently viewing दैनिक देशोन्नती मनस्विनी तर्फे कवयित्री किरण महादेव चौधरी यांना उत्कृष्ठ कवयित्री २०२४ पुरस्कार

दैनिक देशोन्नती मनस्विनी तर्फे कवयित्री किरण महादेव चौधरी यांना उत्कृष्ठ कवयित्री २०२४ पुरस्कार

*विरोधीपक्ष नेते आम.विजय वडेट्टीवार यांची उपस्थिती*

 

गडचिरोली :

दैनिक देशोन्नती मनस्विनी तर्फे आयोजित करण्यात आलेला “श्रावण सोहळा” कार्यक्रम गडचिरोली शहराच्या संस्कृती सांस्कृतिक भवन येथे नुकताच पार पडला. या कार्यक्रमांत विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचे उल्लेखनीय मनस्विनी पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आले.

यावेळी गडचिरोली शहारालगतच्या नवेगाव कॉम्प्लेक्स येथील सौ.किरण महादेव चौधरी यांना काव्यलेखन व कवी संमेलन क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य बजावल्याने त्यांना दैनिक देशोन्नती मनस्विनी तर्फे उत्कृष्ठ कवयित्री २०२४ पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास विरोधी पक्ष नेते आम.विजय वडेट्टीवार, खासदार आमदार होळी, दिपाली सिने गायिका देसाई, दैनिक देशोन्नती मनस्विनी संपादक प्रा.अनिल धामोडे, छाया कुंभारे, संयोजिका सुलभा धामोडे, इत्यादीं मान्यवर उपस्थिती होते.

सौ.किरण चौधरी यांनी सर्व आयोजकांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा