You are currently viewing आम. नितेश राणे यांचा भाजपा मच्छीमार सेल, सिंधुदुर्गतर्फे सत्कार…

आम. नितेश राणे यांचा भाजपा मच्छीमार सेल, सिंधुदुर्गतर्फे सत्कार…

आम. नितेश राणे यांचा भाजपा मच्छीमार सेल, सिंधुदुर्गतर्फे सत्कार…

मालवण

कणकवली- देवगड विधानसभा मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये अनधिकृत एलईडी मासेमारी विषयी आक्रमक भूमिका मांडत एलईडी मासेमारी पूर्णपणे बंद झाली पाहिजे अशी मागणी केली होती. आम. राणे यांच्या या भूमिकेमुळे सरकारला अनधिकृत मासेमारी रोखण्यासाठी ड्रोन टेक्नॉलॉजी सारख्या यंत्रणेचा वापर करण्यासाठी पाऊले उचलावी लागली. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य मत्स्य धोरण समिती च्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये आम. नितेश राणे यांनी अतिशय अभ्यासू आणि योग्य भूमिका मांडली. आम. राणे यांच्या या पारंपारिक मच्छीमारांना बळ देणाऱ्या भूमिकेबाबत भाजप मच्छीमार सेल सिंधुदुर्ग यांच्यातर्फे कणकवली येथील निवासस्थानी आम. राणे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी भाजप मच्छिमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर, वेंगुर्ला येथील वसंत तांडेल, मालवण येथील पंकज सादये, नारायण धुरी, भाऊ मोरजे, वसंत गावकर, देवगड येथून दिनेश पोसम, गणेश कुबल, गुरुनाथ तारी, गुरुदत्त कुबल, नाना कोयंडे, करण कोयंडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मच्छीमार यांच्याशी संवाद साधताना आम. नितेश राणे यांनी एलईडी लाईट संदर्भात पारंपारिक मच्छीमारांच्या कोणत्याही लढ्यात राणे कुटुंबीय सक्षमपणे पाठी उभे राहणार अशी ग्वाही दिली. त्याचबरोबर अनधिकृत एलईडी मासेमारी करणारा स्वपक्षीय असला तरी त्याची गय केली जाणार नाही, असे त्यांनी आक्रमकपणे सांगितले. एलईडी मासेमारी संपूर्णपणे बंद झाली पाहिजे अशी ठाम भूमिका माजी खासदार निलेश राणे त्याचबरोबर खासदार नारायण राणे यांची असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच केंद्रीय स्तरावर मच्छीमारांच्या समस्या मांडण्यासाठी खासदार नारायण राणे सदैव तत्पर असून पारंपारिक मच्छीमारांनी केंद्र स्तरावरील योजना आणि समस्या या विषयात थेट संपर्क साधावा असे आवाहन आम. राणे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा