जमाव बंदी आदेशाबाबत महविकास आघडीतर्फे जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना निवेदन सादर..
ओरोस
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू केला असून सद्या महिला व लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचारामुळे सर्वसामान्य जनतेच्या भावना या तीव्र आहेत. या संदर्भात शांततेच्या मार्गाने त्यांच्या भावना मोकळ्या करण्यासाठी रस्त्यावर उतरून आपल्या भावनाना वाट मोकळी करून देणे हे लोकशाहीत नागरीकांचा अधिकार आहे. आपण जमाव बंदी आदेश लावून हा लोकशाहीने नागरीकांना दिलेला अधिकार हिरावून घेत आहात. तरी हा जमाव बंदी आदेश त्वरित रद्द करावा व नागरिकांना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी लोकशाहीने दिलेला अधिककार बहाल करावा अशा आशयाचे निवेदन कुडाळ आमदार विधानसभेचे आमदार वैभव नाईक, सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष इर्शाद शेख, तसेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना सादर केले आहे.