*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गझलकार जयराम धोंगडे लिखित अप्रतिम गझल रचना*
*रस्त्याने…!*
लेकरा तू लाग चालू आम रस्त्याने,
खाचखळग्यांचा कुटाना वाम रस्त्याने..!
मोकळासा श्वास घ्यावा लेकबाळींनी,
होत जातो का उगा बेफाम रस्त्याने..!
जीव मग कंठात येतो मायबापाचा,
चालतांना लेकरे बदनाम रस्त्याने..!
द्वारका काशी नको बस वाग नीतीने,
लाभती ते चारही या धाम रस्त्याने..!
यातनांनी व्यापले आकाश देहाचे,
पण तरीही चाल वेड्या ठाम रस्त्याने..!
जयराम धोंगडे, नांदेड
[9422553369]