You are currently viewing खाकीच्या मागेही एक संवेदनशील माणूस

खाकीच्या मागेही एक संवेदनशील माणूस

*सावंतवाडी पोलीस ठाण्यात भाजपा महिला पदाधिकाऱ्यांनी साजरे केले रक्षाबंधन*

 

सावंतवाडी :

‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय.!’ हे ब्रीद घेऊन समाजातील अनिष्ट, गुन्हेगारी प्रवृत्तीला कमी करण्यासाठी नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावणारे खाकी वर्दीतील पोलीस नेहमीच आपले संरक्षण करीत आले आहेत. पण सध्याच्या घडीला खाकी बद्दल फारसं चांगलं बोललं जात नाही. अनेकदा पोलीस बांधवांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा नकारात्मक स्वरूपाचाच असतो. मात्र खाकीच्या मागेही एक संवेदनशील माणूस लपलेला आहे, हे जाणलं ते सावंतवाडी येथील भारतीय जनता पक्षाच्या महिला भगिनींनी.

रक्षाबंधनाचे औचित्य साधत सावंतवाडी येथील भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडी पोलीस स्टेशन येथे जात रक्षाबंधन साजरे केले. यावेळी भाजपच्या शहराध्यक्षा मोहिनी मडगावकर, माजी नगरसेविका दिपाली भालेकर, मेघना साळगावकर, मेघा भोगटे, अस्मिता भराडी, साक्षी गवस, शिल्पा सावंत, गीता नाईक, स्नेहल जाधव, ज्योती मुद्राळे आदी उपस्थित होत्या.

भाजपच्या महिला भगिनींचा हा स्तुत्य उपक्रम निश्चितच इतरांसाठी आदर्श आहे. आपली कोणीतरी दखल घेतली. अनेकदा ड्युटीवर असतानाच सण उत्सव साजरा करता येत नाही. बंदोबस्त असला की सणोत्सवात घरी सुद्धा जाता येत नाही. परंतु भाजपच्या या महिला भगिनींच्या स्तुत्य उपक्रमामुळे आपलेही रक्षाबंधन साजरे झाले, अशा भावना यावेळी पोलीस बांधवांनी व्यक्त केल्या. या घटनेमुळे खाकी वर्दीतील पोलीस बांधव चांगलेच भारावले. त्यांनीही आपल्या लाडक्या बहिणींना शुभेच्छा देत भाजपच्या या उपक्रमाचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा