बुलडाणा :
भिममित्र मंडळ क्रांतीनगर बुलढाणा यांच्या वतीने तसेच मा . ऍड. संजयजी राठोड प्रदेश उपाध्य घसरणक्ष काँग्रेस कमिटी महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्यात केळवद ता. चिखली जिल्हा बुलढाणा येथिल साहित्यिक ‘ कवी लेखक ‘ शाहीर ‘मनोहर पवार यांना साहित्यरत्न पुरस्काराने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गांधी भवन बुलढाणा येथे गौरविण्यात आले .
भीम मित्र मंडळ क्रांतीनगर बुलढाणा तसेच संजयजी राठोड प्रदेश उपाध्यक्ष ‘ काँग्रेस कमिटी महाराष्ट्र राज्य ‘ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . या कार्यक्रमांमध्ये शहरात बुलढाणा शहरातील परिसरातील साहित्यिक कवी लेखक सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती तसेच सांस्कृतिक चळवळीतील सातत्याने कार्य करणाऱ्या विविध मान्यवरांचा सत्कार आणि पुरस्कार आयोजित करण्यात आला होता . या प्रसंगी बुलढाणा जिल्ह्यातील अनेक साहित्यिक कलावंत मान्यवर उपस्थित होते . त्यामध्ये केळवद येथिल कवी साहित्य लेखक शाहीर मनोहरराव पवार यांचे साहित्यिक योगदान लक्षात घेऊन त्यांना ‘साहित्यरत्न ‘ पुरस्काराने उपस्थित मा.ज्येष्ठ कवी सर्जेरावजी चव्हाण यांच्या व मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले . साहित्यिक मनोहर पवार यांना यापूर्वीच राज्यभरात विविध पुरस्कार प्राप्त झाले असून त्यांनी तीन आंतरराष्ट्रीय संमेलनात सुद्धा सहभाग घेतलेला आहे तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची साहित्य क्षेत्रामध्ये वेगळी ओळख निर्माण झाली आहे .तसेच त्यांचे अनेक काव्यसंग्रह साहित्य प्रकाशनाच्या वाटेवर आहे . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राध्यापक संतोष जी आंबेडकर प्रमुख अतिथी ‘ आमदार धीरज लिंगाडे तसेच सौ. अलकाताई खंडारे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बुलढाणा ‘ऍड विजय सावळे अध्यक्ष बार असोसिएशन बुलढाणा , दीपक रिंढे जिल्हा काँग्रेस सरचिटणीस प्राध्यापक सुनील सपकाळ ‘ जिल्हा सचिव काँग्रेस कमिटी बुलढाणा , राजीव भाऊ काटीकर माजी नगरसेवक नगर बुलढाणा ‘ बुलढाणा ‘ विनोदजी बेंडवाल माझी न पा . उपाध्यक्ष बुलढाणा , प्रवीण सुरडकरशाहीर डी आर इंगळे ‘ बुलढाणा शहर अध्यक्ष ‘ अनुसूचित जाती विभाग ,आणि गौतम मोरे सामाजिक आदी कार्यकर्ते ‘उपस्थित होते.