You are currently viewing जेष्ठ नागरिक दिवस

जेष्ठ नागरिक दिवस

*काव्य निनाद साहित्य मंच पुणे समूहाचे ज्येष्ठ सदस्य कवी लेखक अनिल देशपांडे लिखित अप्रतिम लेख*

 

*जेष्ठ नागरिक दिवस* 

 

एकवीस ॲागस्ट , आपणांस माहित आहेच की ,या दिवशी जेष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जातो . त्या निमित्ताने शहरांमधे काहिना काही कार्यक्रम साजरे केले जातात . खेड्यात किंवा लहान शहरात याची फारशी कोणाला कल्पनाही नसते ,खेड्यात तर या दिवसात शेतात भरपूर काम असल्याने त्यांना थोडीही ऊसंत नसते !

शहरात तज्ञांकडून जेष्ठ नागरिकांच्या समस्या , आरोग्य ,उतार वयात होणारे आजार व त्याला कसे तोंड द्यायचे , आपला वेळ कसा सत्कारणी लावायचा ,आर्थिक नियोजन तसेच वेगवेगळे छंद कसे जोपासायचे वगैरेंवर भाषण ठेवली जातात वा लेख लिहीली जातात . हे सर्व निश्चीतच ऊपयोगी आहे. त्यामुळे जेष्ठ मित्रांनी व मैत्रिणींनी वेळात वेळ काढून अशा कार्यक्रमाला ऊपस्थित राहून सजग होत राहूया !

मला तर असं वाटतं की जेष्टांचा प्रत्येक दिवस सुकर जाण्यासाठी , “ऊद्याच्या वृध्दांनी “आज पासून साथ द्यायला हवी !

कारण हे सर्व फार महत्वाचे आहे असे मला वाटते !

दुसरं असं की दिवसें दिवस जग व आपण Digital दुनियेत ढकलले जात आहोत . व ती काळाची गरज आहे . फक्त जेष्ठ नागरिकांचा विचार केला तर आपणांपैकी बरेच जण या mobile , on line , lap top , computor वगैरें पासुन लांब असतो , वा कुठल्याशा अनामिक भितीने “मला काही जमत नाही , मला येत नाही , हे सर्व मुलगा वा मुलगी बघते “असे बोलून दूर पळण्याचा ( या वयातही ) प्रयत्न करत असतात .

हे खरंय , मी पण काही काळ या पासून दूरच होतो , पण काळाची गरज बदलली असल्याने आपण कमीत कमी काही Digital गोष्टी शिकणे ( हो , या वयातही !)गरजेचे आहे असे वाटते ! अगदी जुजबी ज्ञान तरी घेउ या !ऊदा. मेसेज करणे , on line payment करणे , फोटो पाठवणे वगैरे .आणि या साठी आपली नातवंड फारच ऊत्तम व सोईस्कर शिक्षक आहेत .

जेष्ठ नागरिक हा समाजाचा एक महत्वाचा घटक असल्याने व आपले राहणीमान अधिक सुसह्य होण्याच्या दृष्टीने २१ॲागस्ट हा दिवस जेष्ठांना समर्पित करण्यात आलेला आहे .

खरं सांगायचं तर आजच्या तरूणांना समयाभावी मनात असुनही बऱ्याच गोष्टी करता येत नाही , ते बाजूला ठेवू या आणि जेष्ठांना जमेल तेवढे प्रेम व आनंद देवूया !

असंही जेष्ठ नागरिकांना प्रेमा खेरीज काहीच नको असतं ! नाही कां ?

********************

पुणे ,

जेष्ठ नागरिक दिवस

२०२४

प्रतिक्रिया व्यक्त करा