त्या नराधमांना तात्काळ अटक करा.!, उबाठा सेनेचे पदाधिकारी आक्रमक.
कुडाळ पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर.
कुडाळ :
बदलापूर पूर्व मधील एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणानं सद्या अख्खा महाराष्ट्र हादरला आहे. अगदी अजाणत्या वयातच दोन चिमुकल्यांना सोसाव्या लागलेल्या या वेदनांमुळे केवळ बदलापुरातील नव्हे तर देशातील प्रत्येकजण हळहळला आणि चिमुरड्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरला आहे. अनेकांनी प्रशासनाला धारेवर धरलं आणि चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या क्रूर नराधमाला फासावर लटकवा, असा एकच सूर लावून धरला. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्याचं आश्वासन दिलं असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल, असंही सांगितलं आहे. तरीदेखील नागरिकांचा रोष काही कमी होण्याचं नाव घेत नाही.
आज या घटनेच्या अनुषंगाने कुडाळ येथे उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर करण्यात आले. बदलापूर केस फास्टट्रॅकवर घेऊन गुन्हेगारांचा तात्काळ शोध घ्यावा व त्यांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी कुडाळ पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, मंदार शिरसाट, संतोष शिरसाट, अतुल बंगे, राजू गवंडे, गुरू सडवेलकर, अनुप नाईक, चेतन शिरोडकर, उदय मांजरेकर, नितीन सावंत, शुभम सिंदगिकर तसेच महिला महिला पदाधिकारी श्रेया परब, श्रेया गवंडे, ज्योती दळवी, श्रुती वर्दम, सई काळप, रोहिणी पाटील, शितल देशमुख आदी उपस्थित होते.
______________________________
*संवाद मीडिया*
*👨🏻🎓ADMISSION OPEN ! प्रवेश सुरू….!👩🏻🎓*
शनैश्वर शिक्षण प्रसारक मंडळ
*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*
माडखोल – सावंतवाडी
▪️महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त अभ्यासक्रम
*🔸डी. फार्म / D. PHARM*
Eligibility: 12th Science (PCB/PCM)
Duration: 2 Years
Intake: 60 Seats
*🔸बी. फार्म /B. PHARM*
Eligibility: 12th Science (PCB/PCM) & (MHT-CET/NEET EXAM)
Duration: 4 Years
Intake: 100 Seats
*🔸एम. फार्म /M. PHARM*
Eligibility: Passed B. Pharm from PCI Approved Institute
1. Pharmaceutical Chemistry
2. Pharmaceutical Quality Assurance
3. Pharmacology Duration: 2 Years
________________________
*♦️शनैश्वर खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI)*
माडखोल – सावंतवाडी
*•ELECTRICIAN 2 Years*
*•GEO-INFORMATICS ASSISTANT 1 Years*
*•WIREMAN 2 Years*
*•HUMAN RESOURCE EXECUTIVE 1 Years*
*महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये*
👉निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगांव स्टेट हायवे लगत सुसज्य शैक्षणिक इमारत
👉अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग
👉अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा व ग्रंथालय
👉अत्याधुनिक संगणक कक्ष, इंटरनेट सुविधा
👉माफक शैक्षणिक शुल्क तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
Email ID-vpcpm2017@gmail.com
Website-www.vpcpm.org
https://kokansadlive.com/kokan/admission-open-entry-begins/11932
*🏬पत्ता: सावंतवाडी-आंबोली रोड, माडखोल, सावंतवाडी*
*प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीकरिता संपर्क*
📱9763824245
📱9420196031
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*