*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*येऊ दे कितीही प्रसंग*
येऊ दे कितीही प्रसंग
मागे नाही हटणार
संकटांशी सदैवच
दोन हात करणार….
सकारात्मकता ठेवते
तोल सांभाळत बुध्दीचा
भिऊ नकोस, हिंमत धरते
खोचून काठ पदराचा….
भले तसेच बुरेही
प्रसंग घडती अनपेक्षित
सारासार बुद्धी ठेवत
करते कामना अपेक्षित…
कणखर मन मजबूत
शरीर हवे तंदुरुस्त
धैर्य जपावे मनाचे
प्रयत्नाची ती शिकस्त……!!
आपत्तीने खचून जात
घ्यायची नाही माघार
लढेन मी जिंकेन मी
एकच मनात निर्धार …..!!
*अरुणा दुद्दलवार*@✍️