You are currently viewing “झिम्माड पाऊस”

“झिम्माड पाऊस”

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*”झिम्माड पाऊस”*

(मुक्त छंद)

 

अचानक रवीवारी आला,

झिम्माड पाऊस गंमतीचा,

मित्र निघाले एकत्र,

हौसेने फिरायला सर्वत्र,

वेगात गाड्या सुटल्या,

घाटात जाऊन पोंचल्या,

घाटातली दरी भयानक च खरी,

धावणारे शुभ्र धुक्याचे ढग,

ओथंबलेले जलकूंभ,

आकाशातली अंधारलेली मेघडंबरी,

धबधब्याने ओसंडून वहात असलेली दरी,

काय अन् कसा वेळ गेला भराभरा,

कडकडून लागली भूक,

समोरच होती चहाची टपरी,

आणि पडत होता झिम्माड पाऊस.

पोचले एका दमात.

चहाची टपरी भज्यांची टपरी ,

होत्या शेजारी शेजारी,

चायपत्ती आणि आलं ,

जमली भट्टी मसाल्याची.

गरम चहाच्या वाफा आल्या अंगावर,

टपरीतलं धुंद गाणं पडलं कानावर,

भजी झाली फस्त,

वर टपरीचा चहा होता मस्त,

त्या मजेची गंमतच न्यारी,

पुन्हा पुन्हा आठवणारी,

न विसरता येणारी.

 

अनुराधा जोशी.

अंधेरी मुंबई ६९

9820023605

प्रतिक्रिया व्यक्त करा