*गैरव्यवहारात अडकलेली तळवडे ग्रामपंचायत उबाठाची*
*पाच सदस्य भाजपाचेच*
*दीपक केसरकर यांच्यावर खालच्या पातळीवर टीका कराल तर गाठ आमच्याशी..*
*सुरज परब यांचा इशारा..*
सावंतवाडी :
भाजपच्या काही लोकांकडून माहिती नसता तळवडे ग्रामपंचायतीवर टीका केली गेली. यात मंत्री दीपक केसरकर यांचा उल्लेख केला गेला. मुळात ही ग्रामपंचायत उबाठा शिवसेनेकडे आहे. त्यातील ५ भाजपचे सदस्य ग्रामपंचायतीत आहेत. त्यामुळे केसरकरांचा याच्याशी संबंध नाही. केवळ प्रसिद्धीसाठी दीपक केसरकर यांच्यावर टीका होत आहे. त्यामुळे हा ट्रेंड आता बंद करा, केसरकरांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका कराल तर गाठ आमच्याशी आहे. शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ असा इशारा युवा नेते सुरज परब यांनी दिला. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सुरज परब म्हणाले, तळवडे ग्रामपंचायतीवर माहिती नसता टीका केली गेली. तसेच यात मंत्री दीपक केसरकर यांचा उल्लेख केला गेला. ही ग्रामपंचायत मुळात उबाठा शिवसेनेकडे आहे. त्यातील ५ भाजपचे सदस्य ग्रामपंचायतीत आहेत. दीपक केसरकरांवर केवळ प्रसिद्धीसाठी टीका होत आहे. त्यामुळे हा ट्रेंड आता बंद करावा असा इशारा त्यांनी दिला. तसेच महायुतीत फुट पाडण्याच काम काही लोक करत आहेत. खा. नारायण राणे व दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली महायुती काम करत आहे. यापुढे जर दीपक केसरकर यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका कराल तर गाठ आमच्याशी आहे. हे थांबलं नाही तर शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ असा इशारा श्री. परब यांनी दिला.
ते पुढे म्हणाले, उबाठाला मदत करण्याचा कोणताही विषय नाही. भाजपने आम्हाला साथ दिली तर सर्व सदस्यांचे राजीनामे घेण्यासाठी आम्ही आग्रही राहू, ग्रामपंचायत बरखास्त करू. चांगली लोक निवडून देऊ, अपहाराला दीपक केसरकर कधीही पाठिशी घालणार नाही. जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही स्वतः प्रयत्न करू. आम्हाला वाचवायचं असतं तर आमच्या पक्षात ते सरपंच व सदस्य असले असते. मात्र, ते उबाठात आहेत. आमच कुटुंब असणाऱ्या गावासोबत जे चुकीचं वागले त्यांना माफी मिळणार नाही. तळवडे गावान आम्हाला ओळख दिली. ७५ लाख आमच्या लोकांचे आहेत. त्यामुळे अजून कुणी गुन्हेगार असतील तर त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे. काम झाली नाहीत ही वस्तुस्थिती आहे असं सुरज परब यांनी सांगितले.
दरम्यान, विद्यमान सदस्य दादा परब यांनी तळवडे ग्रामपंचायत अपहाराची माहिती नाही असं म्हंटले. मात्र, ते स्वतः ग्रामपंचायत सदस्य आहेत. तसेच अफरातफर करणारे ग्रामसेवक आहेत असं ते म्हणाले. जर याची तुम्हाला कल्पना होती तर त्यांच्यावर अंकुश का ठेवला नाही ? सभेत विरोधी ठराव दिसले नाहीत. सर्वानुमते सभासद जर ठराव मंजूर करतात तर संगतमताने अपहार केलाय असं निदर्शनास येत. तसेच तालुक्याच नेतृत्व करण्याची संधी ज्यांना गावांन दिली त्यांनी यासाठी का प्रयत्न केले नाहीत ? दुसऱ्याच्या कुबड्या घेऊन त्यांना पत्रकार परिषद का घ्यावी लागली ? स्वच्छतेसह सर्वात आदर्श असणारा असा आमचा गाव आहे. मात्र, याला डाग लावण्याचा प्रकार अपहारातून घडला आहे. निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी गावचा सन्मान राखण आवश्यक होते असं मत शाखाप्रमुख जालिंदर परब यांनी व्यक्त केले. यावेळी युवा नेते सुरज परब, शाखाप्रमुख जालिंदर परब, खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष राजन रेडकर आदी उपस्थित होते.