*रक्षाबंधनचे औचित्य साधून वामनराव महाडिक विद्यालयाचा अनिभव उपक्रम*
*वामनराव महाडिक विद्यालयाच्या सहकार्यासाठी तळेरे रिक्षा संघटना सदैव तत्पर : राजकुमार तळेकर*
कणकवली
रिक्षा संघटनेचा प्रत्येक सदस्य वामनराव महाडिक विद्यालयाच्या सहकार्यासाठी सदैव तत्पर असेल असे प्रतिपादन तळेरे रिक्षा संघटना अध्यक्ष राजकुमार तळेकर यांनी केली.ते वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,तळेरे तसेच श्रावणी कॉम्प्युटर्स तळेरेे यांच्या संयुक्त विद्यमाने बस स्थानका समोर रिक्षा संघटने च्या परिसरात रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला याप्रसंगी त्यांनी प्रसंगोद्दगार काढले .
यावेळी भाजपचे कणकवली तालुका अध्यक्ष दिलीपभाई तळेकर, सरपंच हनुमंत तळेकर,माजी उपसरपंच दिनेश मुद्रस, रिक्षा संघटना उपाध्यक्ष व शाळा स.सदस्य संतोष तळेकर,टेम्पो संघटना अध्यक्ष रविंद्र तळेकर, सहा सीटर संघटनेचे सदस्य निलेश तळेकर,विजय पेडणेकर,रिक्षा संघटना
सहखजिनदार संजय राऊत, माजी तळरे रिक्षा संघटना उपाध्यक्ष प्रकाश कुमठेकर, पत्रकार गुरुप्रसाद सावंत व संजय खानविलकर,श्रावणी कम्प्युटर्स चे सर्वेसर्वा श्री.व सौ.सतीश मदभावे उपस्थित होते.
आजचा दिवस हा भाऊ-बहिणीचा प्रेमाचा दिवस आहे आणि या दिवशी प्रशालेच्या सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांनी हा अनिभव उपक्रम घेतल्याबद्दल प्रशालेचे प्राचार्य अविनाश मांजरेकर व सर्वांचे कौतुक असे प्रतिपादन शाळा स.सदस्य व व्यापारी संघटना अध्यक्ष प्रवीण वरुणकर यांनी केले. रिक्षा संघटना,टेम्पो संघटना तसेच सहासीटर संघटना या सर्वांचे प्रशालेला नेहमीच मोलाचे सहकार्य असते आणि ते असेच सातत्याने टिकण्यासाठी रक्षाबंधनाचे औचित्य साधुन सर्व सदस्यांना राखी बांधण्याचे भाग्य आमच्या प्रशालेला लाभल्याबद्दल आम्ही सर्वांचे ऋणी आहोत असे प्रतिपादन प्रशालेचे प्राचार्य अविनाश मांजरेकर यांनी केले. नशाबंदी मंडळ,सिंधुदुर्ग यांचा एक राखी व्यसनमुक्तीच्या वचनाची या उपक्रमांतर्गत समाजातील प्रत्येक शक्य असलेल्या व्यक्तींना व्यसनमुक्तीची राखी बांधून ‘आपण व्यसनमुक्त राहूया’असा संदेश या उपक्रमातून सौ.श्रावणी मदभावे यांनी दिला. यावेळी विविध धान्यांपासून तयार केलेली प्रतीकात्मक राखी,व्यसनमुक्तीची राखी तयार करण्यात आली.
प्रशालेचे प्राचार्य अविनाश मांजरेकर यांच्या संकल्पनेतून सहा.शिक्षक पी.एन.काणेकर, एन.पी.गावठे तसेच सर्व वर्ग शिक्षक,इतर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने प्रशालेत राखी स्पर्धा हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी प्रशालेमध्ये घेण्यात आलेल्या राखी स्पर्धेत प्रथम तीन क्रमांक व उत्तेजनार्थ दोन क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे: *प्रथम गट*- पाचवी ते सातवी- 1)मृण्मयी निलेश पवार 2)आरोही अजित गोसावी 3)आरोही स्वप्निल पवार 4)विराट निलेश पवार 5)शुभांगी विजय घाडी.
*द्वितीय गट*- आठवी ते दहावी-1)प्रियांका प्रकाश शिंगे, 2)आर्या संतोष गुरव
3)अथर्व भूषण तळेकर
4)तन्वी गंगाराम राठोड
5)मयुरी मनोज सुतार.
*तृतीय गट* -अकरावी व बारावी- 1)तन्वी घाडी
2)अनुश्री वळंजू3)आयुष सुतार 4) चैताली तळेकर 5)निशांत घाडी.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रशालेचे प्राध्यापक सचिन शेटे यांनी केले.
_____________________________
*संवाद मीडिया*
*S संजना टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स*
*🔸अंदमान – 5 दि – 33,990/-*
*🔹छत्तीसगड – 5 दि – 24,990/-*
*🔸हिमाचल – शिमला मनाली चंदीगड – 7 दि – 28,990/-*
*🔹काश्मीर वैष्णोदेवी – 6 दि – 32,990/-*
*🔸लेह लडाख – 7 दि – 39,990/-*
*🔹नैनिताल मसुरी कोरबेट – 6 दि – 33,990/-*
*🔸अमृतसर – 4 दि – 17,990/-*
*🔹पांडेचेरी कांचीपुरम महाबलीपुरम – 5 दि – 31,990/-*
*🔸हैदराबाद रामोजी फिल्म सिटी – 5 दि – 32,990/-*
*🔹केरळ कन्याकुमारी – 6 दि – 24,990/-*
*🔸इंदोर उज्जैन मांडू – 4 दि – 25,990/-*
*🔹राजस्थान – मेवाड मारवाड – 7 दि – 28,990/-*
*🔸दिल्ली आग्रा – 4 दि – 20,990/-*
*🔹चार धाम – 13 दि – 71,990/-*
*🔸अहमदाबाद वडोदरा स्टॅच्यू ऑफ युनिटी – 5 दि – 22,990/-*
*🔹हम्पी बदामी – 5 दि – 26,990/-*
*🔸अष्टविनायक यात्रा – 3 दि – 11,990/-*
*🔹ओरिसा – 5 दि – 28,990/-*
*🔸सिक्कीम दार्जिलिंग – 7 दि – 39,990/-*
*जीएसटी आणि टीसीएस अतिरिक्त*
*अधिक माहिती व बुकिंग करिता संपर्क*
*संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स* 🚘🚎✈️🚆
*📲 7350 7350 91/ 7350 534 534*
*जाहिरात
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*
ओळख