You are currently viewing रक्षाबंधन

रक्षाबंधन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*रक्षाबंधन*

 

ओवाळणी नको भाऊराया

सण राखी पौर्णिमेला

राखी बांधते बहिण

दिन रक्षा बंधनाला

 

प्रेमभाव अंतरी असावा

त्यात नसावा दुरावा – देखावा

आपुलकीच्या नात्याचा

रोज सुर्य उगवावा

 

नको मजला पैसा अडका

नको हिस्सा घरात

पाठीशी उभा रहा तू

कृष्णा सारखा

बहिणीच्या रक्षणात

 

औक्षण करूनी मागणे एक

दिन पुनवेची रात

सागरा सारखा

भरून सदा रहा

बहिणीच्या प्रेमात

 

प्रित वेडी ही बहिणीची

रेशीम धागा बांधते

दारात उभी राहून

वाट भावाची पाहते

 

ये रे भाऊराया आता

जीव झाला रे अधीर

राखी बांधण्या भावाला

बहिण आहे आतूर

 

ओवाळणी नको भाऊराया

सण राखी पौर्णिमेला

राखी बांधते बहिण

दिन रक्षा बंधनाला

 

कवी:-

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*चांदवडकर, धुळे.*

7588318543

8208667477.

प्रतिक्रिया व्यक्त करा