कुडाळ :
सिंधुदुर्ग महामार्ग वाहतूक पोलिसांनी सोमवारी झाराप येथे वाहन चालकांशी संवाद साधला. वाहतुकीचे नियम पाळा, सुरक्षित प्रवास करा असा प्रबोधनात्मक संवाद साधला.
सोमवारी सिंधुदुर्ग वाहतूक पोलीस मुंबई गोवा महामार्गावर वाहन चालकांशी संवाद साधताना पहायला मिळाले.वाहन चालकांच्या सुरक्षिततेसाठी नियमांची जाणीव करुन देत होते.
वाहतूक मदत केंद्र कसाल पोलीस हवालदार बांदेकर, अमलदार पिळगावकर ,उमेश राणे , गावडे या वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना माऊली मंदिर झाराप येथे सुरक्षित ठिकाणी थांबवून रस्ता वाहतुकीचे नियम सांगून त्यांचे प्रबोधन केले.
अपर पोलीस महासंचालक (वा) म.रा मुंबई, पोलीस अधीक्षक सो, म सु प रायगड विभाग, पोलीस उपधीक्षक सो म सु प रायगड विभाग, पोलीस निरीक्षक सो, म सु प रत्नागिरी विभाग, मार्गदर्शनाप्रमाणे, थांबून खालील प्रमाणे संभाव्य अपघात टाळण्या साठी घ्यावयाचे दक्षते बाबत मार्गदर्शन करून प्रबोधन, जनजागृती करण्यात आली.
*1) मोटार सायकल चालवताना नेहमी हेल्मेट चा वापर करावा.*
*2) वाहन चालवितांना मोबाईल फोनचा वापर टाळावा .*
*3) गाडीचे कागदपत्रे नेहमी सोबत ठेवावी.*
*4) वाहनांवर विशेषतः पाठी मागील बाजू रिफ्लेक्टर लावावे*
*5) दारू पिवून वाहन चालवू नये.*
*6) महामार्गावर धोकादायक परिस्थितीत कोणतेही वाहन थांबवू नये.*
*7) नेहमी ओव्हरटेक करतांना उजव्या बाजूने करावे.*
*8) वाहन चालविताना वेग मर्यादाचे पालन करावे.*
*9) विरुद्ध दिशेने वाहन चालवू नये.*
*10) वाहन चालवताना वाहतूक चिन्हे पाहून त्या सूचना प्रमाणे वाहन चालवावे.*
*11) चारचाकी वाहन चालवताना चालक तसेच🤦♂️ सर्वच प्रवाशांनी सीटबेल्ट वापरावे.*
12) अल्पवयीन मुलांना वाहन चालविणेस देऊ नये.
13) दुचाकीवरून मालाची वाहतूक करू नये
14) सद्या महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरु आहे, काम चालू असले ठिकाणी वाहन सावकाश काळजीपूर्वक चालवावे
15) वाहणाचे टायर,ब्रेक,साईड इंडिकेटर,आरसा,ई.स्पेअर पार्ट सुस्थितीत असलेची खात्री करावी
16) महामार्गवरून दुचाकी चालवताना शोल्डर लेनचा वापर करावा.
*17) ट्रिपल सिट प्रवास करु नये.*