You are currently viewing “अशोकजी सिंघल यांचे जीवन श्रीराममय होते!”

“अशोकजी सिंघल यांचे जीवन श्रीराममय होते!”

*”अशोकजी सिंघल यांचे जीवन श्रीराममय होते!”*

पिंपरी

“श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे सरसेनानी अशोकजी सिंघल यांचे अवघे जीवन श्रीराममय झाले होते!” असे गौरवोद्गार विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्र मंत्री गोविंद शेंडे यांनी चिंचवडगाव येथे रविवार, दिनांक १८ ऑगस्ट २०२४ रोजी काढले. विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत आयोजित, साप्ताहिक विवेक संपादित अशोकजी सिंघल यांच्या जीवनावर आधारित विशेषांकाच्या प्रकाशनात गोविंद शेंडे बोलत होते. विश्व हिंदू परिषद केंद्रीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे, प्रांत अध्यक्ष पांडुरंग राऊत, उपाध्यक्ष माधवी सौंशी, प्रांत मंत्री किशोर चव्हाण, प्रांत सह मंत्री ॲड. सतिश गोरडे, प्रा. संजय मुद्राळे, डॉ. प्रतिभा बोथारे आणि अनिल सांबारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

गोविंद शेंडे पुढे म्हणाले की, “प्रत्येक भेटीत अशोकजी यांनी माझ्यावर पुत्रवत प्रेम केले. प्रत्येक कार्यकर्त्यावर त्यांनी वडिलांसारखी माया केली. पूजनीय गुरुजी यांच्यानंतर संघ परिवारात अशोकजी सिंघल यांनी संतांच्या प्रति आत्मीयता आणि समर्पित भाव प्रदर्शित केला. लहान असो की मोठा असो पण कोणत्याही संत व्यक्तिमत्त्वाला आदराने झुकून ते चरणस्पर्श करीत असत. अनेकांनी यांवर ‘अशोकजी, तुम्ही आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहात’ असे सांगितले होते. श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलनाच्या संदर्भात पूज्य देवराव बाबा यांचा आशीर्वाद घ्यायला ते गेले असता बाबा म्हणाले की, ‘तू फक्त रामनामाचा झंझावात सुरू कर म्हणजे यश मिळेल!’ आणि खरोखरच त्यांच्या आंदोलनाला सर्व दिशांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. केवळ देशातच नव्हे तर विदेशात त्यांना अनुकूल प्रतिसाद लाभला. अशोकजी सिंघल यांचे अवघे जीवन संघशरण, संतशरण, संघटणशरण आणि श्रीराममय झाले होते. त्यांच्या नेतृत्वाखालील विवादास्पद चबुतरा उखडून टाकण्यात आला आणि कालांतराने श्रीरामाचे भव्य मंदिर तिथे उभे राहिले. माननीय अशोकजी सिंघल यांना समजून घ्यायचे असेल तर ‘विवेक’चा हा अंक आवर्जून वाचा!” असे आवाहन त्यांनी केले. श्रीपाद रामदासी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

______________________________
*संवाद मिडिया*

👗👗👗👗👗👗👗👗👗

*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*

*𝙼𝚊𝚔𝚎 𝚢𝚘𝚞𝚛 𝙿𝚊𝚜𝚜𝚒𝚘𝚗 𝚈𝚘𝚞𝚛 𝙿𝚛𝚘𝚏𝚎𝚜𝚜𝚒𝚘𝚗…*
*𝙲𝚊𝚛𝚎𝚎𝚛 𝚒𝚗 𝙵𝚊𝚜𝚑𝚒𝚘𝚗 𝙳𝚎𝚜𝚒𝚐𝚗𝚒𝚗𝚐…*
👗👗👗👗👗👗👗👗👗

*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*

*𝙳𝚒𝚙𝚕𝚘𝚖𝚊 𝚒𝚗 𝚃𝚎𝚡𝚝𝚒𝚕𝚎 & Fashion Designing*

(SNDT विद्यापीठ, मुंबई मान्यताप्राप्त अभ्यासक्रम)
*🔸कालावधी :- २ वर्षे*
*🔸 प्रथम वर्षाकरीता प्रवेश पात्रता :-कोणत्याही शाखेची १२ वी परीक्षा उत्तीर्ण.*

🔸 *वैशिष्ट्ये :-*
✅ तज्ञ व अनुभवी अध्यापक वर्ग.
✅ अद्ययावत फॅशन व टेक्स्टाईल लॅब.
✅ फॅशन इंडस्ट्रीतील नामांकित कंपन्यांमध्ये क्षेत्र भेटी.
✅ सर्व सोयींनी युक्त वसतिगृह व मेस सुविधा उपलब्ध.
✅ डिप्लोमा नंतर डिग्री अभ्यासक्रमास प्रवेशास पात्र.
✅ नामांकित फॅशन कंपन्या मध्ये नोकरीच्या अधिक संधी अथवा स्वतःचा स्टार्टअप व्यवसायास उपयुक्त.

*संपर्क:*

*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय*
*साखरतर रोड, शिरगाव, रत्नागिरी*,

*अधिक माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क करावा:*
*📱 74998 21369*

कृपया पुढील Google form भरावा :
https://forms.gle/k5HygsNxeUTTMJmb7

*Advt 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा