You are currently viewing अर्चना अष्टुळ यांना राष्ट्रीय कार्यगौरव पुरस्कार प्रदान

अर्चना अष्टुळ यांना राष्ट्रीय कार्यगौरव पुरस्कार प्रदान

पुणे :

साहित्य सम्राट पुणे या संस्थेने मागील बारा वर्षांत केलेल्या साहित्यिक उपक्रमांसाठी संस्थेच्या सचिव सौ.अर्चना अष्टुळ यांनी बहुमूल्य योगदान दिले आहे. त्यांचे हे कार्य कौतुकास्पद असल्याने काव्यमित्र पुणे या संस्थेने २४व्या वर्षी सायन्स पार्क, तारांगण हॉल पिंपरी चिंचवड येथे आयोजित केलेल्या विविध पुरस्कार प्रदान सोहळ्यात सौ.अष्टुळ यांना राष्ट्रीय कार्यगौरव पुरस्कार २०२४ मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी विचारपीठावर माननीय माजी कुलगुरू डॉ.पंडित विद्यासागर, विस्तार अधिकारी व्ही. जे. वाघमारे, सेवाभावी मुख्याध्यापक बालाजी जाधव, राजेंद्र बसरीकट्टी, वनिता पंडित इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमांमध्ये निमंत्रितांचे कवी संमेलन, विविध क्षेत्रातील मान्यवरांना विविध पुरस्कार तसेच “कागदावरचे मन” या कवितासंग्रहाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सभागृहात राजेंद्र दिवटे, सहदेव भवाळ, बिभीषण पोटरे, डॉ.स्वप्नील शिंदे, प्रभु जाचक, माया सोनवणे, दत्तात्रय इंगळे, डॉ.रमाणिक लेनपुरे, देविदास कडू इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन उफाडे यांनी, सूत्रसंचालन साक्षी सगर यांनी तर आभार संयोजक तसेच काव्यमित्रचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र सगर यांनी व्यक्त केले.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा