You are currently viewing समुह गायन स्पर्धेत उभादांडा न्यू इंग्लिश स्कूलचे यश

समुह गायन स्पर्धेत उभादांडा न्यू इंग्लिश स्कूलचे यश

समुह गायन स्पर्धेत उभादांडा न्यू इंग्लिश स्कूलचे यश

वेंगुर्ला

शिक्षणमंत्री दिपकभाई केसरकर मित्र मंडळ आणि शाश्वत बहुउद्देशीय संस्था आयोजित श्रावणधारा महोत्सवात स्वातत्र दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी मतदार संघासाठी शालेय मुलांसाठी राष्ट्रभक्ती समुह गायन स्पर्धेचे आयोजन वेंगुर्ले हायस्कूल वेंगुर्ले येथे करण्यात आले होते
या समुहगान स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा हायस्कूल ने सहभागी होत प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले.
या स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी
साक्षी तुळसकर
स्नेहा वेंगुर्लेकर
मेघा मयेकर
वैष्णवी कोचरेकर
अमृता नवार
गायत्री साधले
युगा मातोंडकर
दिव्या पेडणेकर
जिया साळगांवकर
वैष्णवी तांडेल
नेहा साळगांवकर
रीया साळगांवकर
ह्या सहभागी झाल्या होत्या.
यांना विशेष मार्गदर्शन या प्रशालेचे निवृत्त अध्यापक श्री.कुबल सर लिपिक अजित केरकर आणि प्रा वैभव खानोलकर या सह इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेता न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना रोख रूपये तिनं हजार पाचशे, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात.
या स्पर्धेत सतरंगी रंगो का हे राष्ट्रभक्ती पर गीत न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केले आणि यासाठी हार्मोनियम वादन कुबल सर तर तबला वादन कु.मंदार आरोदेकर यांनी केले.
या उल्लेखनीय यशाबद्दल न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा वेंगुर्ले हायस्कूलचे मुख्याध्यापक उमेश वाळवेकर, संस्था अध्यक्ष विरेंद्र आडारकर कामत, सचिव जेष्ठ रांगोळीकार रमेश नरसुले, उपाध्यक्ष निवृत्त गट शिक्षणाधिकारी रमेश पिगुळकर, निलेश मांजरेकर आणि सर्व पदाधिकारी यांनी या स्पर्धेचे विजेते ठरलेले विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी या बरोबरच तबला वादक मंदार आरोदेकर याचे ही विशेष अभिनंदन केले असुन विविध स्तरांवर या उल्लेखनीय कामगिरी प्रशालेचे कौतुक केले जात आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा