*बांदा केंद्र शाळेच्या वतीने सीमेवरील जवानांना राख्या*
*बांदा*
एक राखी जवानांसाठी सीमेवरच्या भावांसाठी या उपक्रमांतर्गत पी एम श्री जिल्हा परिषद बांदा नं१ केंद्र शाळेतील स्काऊट गाईड या पथकातील विद्यार्थ्यांनी स्वनिर्मित राख्या बनवून पोस्टामार्फत २५१राख्या जवानांना पाठविण्यात आल्या. बहिण भाऊ यांचे अतूट नाते असलेल्या रक्षाबंधन या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ऊन, वारा ,पाऊस याची तमा न बाळगता भारतीय जवान हे अहोरात्र पहारा देत असतात. रक्षाबंधन सणाच्या दिवशी देशसेवेसाठी तैनात असलेल्या जवानांना घरी येऊ राखी बांधून घ्यायला येणे शक्य नसते.सैन्यातील या भावांचा उत्साह वाढावा व बहिणीच्या मायेचा मिळावा यासाठी बांदा केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वनिर्मित राख्या राख्या पाठवून सैनिकां विषयी कृतज्ञता व्यक्त केली . प्रशालेच्या वतीने दरवर्षी सीमेवरच्या जवानांना राख्या पाठविण्याचा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक शांताराम असनकर , स्काऊटर शिक्षक जे.डी पाटील, पदवीधर शिक्षक उदय सावळ, रसिका मालवणकर, स्नेहा घाडी,शुभेच्छा सावंत, जागृती धुरी, फ्रान्सिस फर्नांडिस, कृपा कांबळे,मनिषा काळे ,मृणाल परब यांचे मार्गदर्शन लाभले.या उपक्रमाला बांदा पोस्ट कर्मचारी यांचेही सहकार्य लाभले.
_____________________________
*संवाद मीडिया*
🚕🚗🚕🚗🚕🚗🚕🚗🚕🚗🚕
माई ह्युंदाई सिंधुदुर्गात सुरु झालाय
*श्रावण महोत्सव*
*श्रावण स्पेशल ऑफर्स*
_ह्युंदाईच्या विशाल श्रेणीतील सीएनजी ऑरा, एक्सटर आणि निओस वर मिळेल_
*इन्शुरन्स एकदम फ्री*
*आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आजच कॉल करा* 📲
माई ह्युंदाई कुडाळ
उद्यमनगर
*संपर्क:* 7410006037
माई ह्युंदाई कणकवली
वृक्षवल्ली नर्सरी वागदे
*संपर्क:* 8956130166
_माई ह्युंदाई कुडाळ आणि कणकवली येथे आता सुसज्ज आणि अद्ययावत *वर्कशॉप*_
_आता मुंबई, गोवा,कोल्हापूरला जायची गरज नाही, कुडाळ माई ह्युंडामध्ये आपल्या सेवेसाठी अत्याधुनिक *बॉडी शॉप* सेवा सुरु आहे !_🚕🚗
*माई ह्युंदाई अविरत सेवेची पंचवीस वर्ष ….*
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*