You are currently viewing जिल्हास्तरीय समूहगीत गायन स्पर्धेत पणदूर हायस्कूल अव्वल

जिल्हास्तरीय समूहगीत गायन स्पर्धेत पणदूर हायस्कूल अव्वल

कुडाळ :

लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑप. बॅंकेमार्फत स्वातंत्र्यदिनानिमीत्त कणकवली काॅलेज येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समूहगीत गायन स्पर्धेत वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित गुरुवर्य कै. शशिकांत अणावकर सर विद्यानगरी शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय पणदूरतिठा या प्रशालेला लहान व मोठ्या गटात प्रथम क्रमांक प्राप्त झाला.

सर्व सहभागी विद्यार्थी- विद्यार्थीनी व संगीत शिक्षक श्री. महेश तळगांवकर सर यांचे संस्था अध्यक्ष मान. श्री. आपासाहेब गावडे, संस्था सचिव श्री. नागेंद्र परब, उपाध्यक्ष श्री. प्रकाश जैतापकर, सर्व संस्थाचालक, मुख्याध्यापक श्री. संजय मालवणकर सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मन:पूर्वक अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा