आडेली येथील खून प्रकरणातील पत्नीसह सासू सासऱ्याना ३० ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी…
तिघांची सावंतवाडी येथील कारागृहात रवानगी
वेंगुर्ले
वेंगुर्ले तालुक्यातील आडेली पेडणेकरवाडी येथे सासरवाडी च्या नर्सरीत माणगाव तळीवाडी येथील तरुण वसंत उर्फ सागर प्रभाकर भगे वय ३२ याचा मृतदेह मंगळवार १३ ऑगस्ट ला सकाळी आढळला होता. या प्रकरणी वेंगुर्ले पोलिसांनी त्याची पत्नी आणि सासू-सासरे यांना अटक केली होती. त्यावेळी त्यांना १६ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्या तिघांना ३० ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी देऊन त्यांची सावंतवाडी येथील कारागृहात रवानगी केली आहे.
आडेली येथील खून प्रकरणी वेंगुर्ले तालुक्यात वेगवेगळी चर्चा सध्या सुरू आहे. पोलीसही आपल्या परीने कसून तपास करत आहेत. मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच त्याचा मृत्यू विजेच्या शॉक मुळे की अन्य काही कारणामुळे हे स्पष्ट होणार आहे. डिसेंबर मध्ये लग्न झाल्यानंतर काही दिवसापासूनच मयत सागर आणि त्याची पत्नी नूतन या दोघांमध्ये भांडण होत होते. त्यामुळे नूतन ही आडेली येथे वडील शंकर सखाराम गावडे आणि आई पार्वती शंकर गावडे या दोघांसमवेत राहत होती. यावेळी सागर याने अनेक वेळा नूतन हिला आपल्या घरी माणगाव येथे एकत्र राहूया असे सुचविले. मात्र ती तेथे जाण्यास तयार नव्हती त्यामुळे ती आपल्या आई-वडिलांबरोबर आडेली येथे राहत होती.