मालवण शहर कार्यक्षेत्रामध्ये ७ हत्तीरोग दुषित रुग्ण
सिंधुदुर्गनगरी
मालवण शहर या कार्यक्षेत्रामध्ये एकूण ७ हत्तीरोग दुषित रुग्ण आढळून आलेले आहेत. हत्तीरोग प्रसारक क्यलेक्स डासांच्या घनतेमध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे जिल्हा हिवताप कार्यालय व आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या समन्वयाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई रुपेश धुरी यांनी दिली आहे.
मालवण शहरात हत्तीरोग रुग्ण आढळलेल्या भागात केलेल्या प्रतिबंधात्मक उपायोजना व विशेष सर्व्हेक्षण अहवाल दि. १६ ऑग्स्ट २०२४ नुसार
हत्तीरोग रुग्ण सर्व्हेक्षणा करीता हत्तीरोग रात्र चिकित्सालय ग्रा.रु. मालवण यांच्यामार्फत दैनंदिन सर्व्हेक्षण, हत्तीरोग रात्र चिकित्सालय ग्रा. रु. मालवण यांच्यामार्फत हत्तीरोग रुग्ण सर्व्हेक्षणा करीता दैनंदिन सर्व्हेक्षण रात्री ८ ते १२ या दरम्यान नियमित सर्व्हेक्षण करण्यात येत. या नियमित सर्व्हेक्षणामधून माहे जून या महात घेण्यात आलेल्या ७८५ रक्त नमुने मधून तपासणी अंती सोमवार पेठ या भागातील एक महिला रुग्ण दुषित आढळून आली. या रक्तनमुना सहायक संचालक आरोग्य सेवा (हि) कोल्हापूर या कार्यालयाकडे पुर्नपडताळणीसाठी पाठविण्यात आलेला होता. पुर्नपडताळणी अंती या रक्तनमुना दुषित आढळल्यानंतर त्वरीत खालीलप्रमाणे उपययोजना आहे.
आरोग्य विभागामार्फत रुग्ण आढळलेल्या भागात विशेष हत्तीरोग सर्व्हेक्षण, १५ जुलै २०२४ पासून संपुर्ण मालवण शहरात विशेष हत्तीरोग सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. मालवण शहरातील एकूण १६५०० लोकसंख्येच्या सर्व्हेक्षणा करीता एकूण २० रात्रकालीन सर्व्हेक्षण पथके निर्धारीत करुन आजअखेर मालवण शहरामधून एकूण १६५०० लोकसंख्येपैकी एकुण घरे ५३२७ एकूण कुटुंबे ५२४८ मधुन दि. १४ ऑगस्ट २०२४ पर्यत १०२९८ एवढे रक्त नमुना गोळा करण्यात आले आहेत. विशेष सर्व्हेक्षणात घेतलेल्या रक्त नमुना पैकी ८६०० रक्त नमुन्याची तपासणी करण्यात आलेली असून त्यापैकी ७ रक्तनमुने तपासणीत हत्तीरोग दुषित आढळून आले.
दुषित रुग्ण आलेल्या भागाचे नाव रुग्ण संख्या, सोमवर पेठ १ रुग्ण (६६ वर्षीय महिला), भरड, १ रुग्ण (६६ वर्षीय महिला), गंवडीवाडा १ रुग्ण (१७ वर्षीय महिला), भरड १ रुग्ण (५८ वर्षे पुरुष), मेढा १ रुग्ण (५८ वर्षे पुरुष), रेवतेळे १ रुग्ण ( ३० वर्षे पुरूष), रेवतळे १ रुग्ण (८० वर्षे पुरुष) या बाधित रुग्ण व त्यांच्या सहवासितांना त्वरीत हत्तीरोग विरोधी औषधोपचार सुरु करण्यात आलेला आहे.
किटकशास्त्रीय सर्व्हेक्षण दि. १२ जुलै २०२४ पासून सोमवार पेठ, वायरी बौध्दवाडी, गंवडीवाडा, मेढा, रेवतळा, देवुळवाडा, भरड, मोहल्ला वायरी या भागात किटकशास्त्रीय सर्व्हेक्षण करण्यात आलेले आहे. ज्या भागात डास अळी घनतेत वाढ झालेली आहे. त्याठिकाणी डासअळी घनता कमी करणे करीता आरोग्य विभाग व मनपा मालवण याच्या मार्फत १५ जुलै पासून सर्व्हेक्षण पथकामार्फत कार्यवाही सुरु आहे.
डासअळी घनता कमी करणे करीता राबविण्यात आलेल्या उपाययोजना, एकूण ५ सर्व्हेक्षण पथकामार्फत मालवण शहरातील एकूण १७ वाडॉतील एकूण १०५ डासोत्पत्ती स्थानात गप्पी मासे सोडण्यात आलेले आहेत. तसेच सर्व्हेक्षण पथकामार्फत विनावापर पाण्यात व घरांच्या आजुबाजुच्या परीसरातील डबकी व गटारे यामध्ये क्युलेक्स अळी नाश करण्याकरीता (टेमिफॉस) वापर करण्यात येत आहे.
धुरुवारणी/ जंतुनाशक फवारणी, मालवण शहरातील एकूण १७ वार्डातील एकुण १०६३ घरामधून धुरुवारणी करण्यात आलेली आहे. उर्वरीत घरामधून धुरुवारणी करण्याचे काम धुरफवारणी पथकामार्फत चालु आहे. साचलेली डबकी व गटारे अशा १५९ ठिकाणी जंतुनाशकाची फवारणी करण्यात आलेली आहे. उर्वरीत भागात जंतुनाशकाची फवारणी करण्याचे काम सुरु आहे.
आरोग्य शिक्षण व जनजागृती, आरोग्य विभागार्फत नियमित सर्व्हेक्षण पथके व विशेष सर्व्हेक्षण पथकामार्फत हत्तीरोग आजार लक्षणे चिन्हे, प्रतिबंधात्मक उपाययोजना रात्रकालीन सर्व्हेक्षण पथकामार्फत करण्यात येणाऱ्या सर्व्हेक्षणाचे महत्व याबाबत आरोग्य शिक्षण देण्यात आलेले आहे. शहरातील पुर्ण प्राथमिक शाळा व महाविद्यालये, इतर शैक्षणिक संस्था अशा एकूण २२ संस्थामध्ये प्रत्यक्ष भेटीव्दारे हत्तीरोग विषयक आरोग्य शिक्षण देण्यात आलेले आहे. हत्तीरोग विषयक ५००० माहितीपत्रके घरोघरी वाटप करण्यात येत आहेत.
जिल्हास्तरावर उपलब्ध औषधसाठा व साहित्य सामुग्री, उपलब्ध प्रतिबंधात्मक औषधसाठा डीईसी गोळ्या ४२०००,उपलब्ध साहित्य सामुग्री बीटीआय पावडर ३० किलो, लानसेट २१६२५ नग, पायरेथ्रम (धुर फवारणी) २१४ लि.,काचा १९७१०० नग, टेमिफॉस (अळीनाशक) २५० लि., स्वॉब २४३६५० नग, आवश्यकतेनुसार औषधसाठा संबंधित संस्थेस मागणीनुसार देण्यात येत आहे.
विशेष उपक्रम व उपाययोजना, माहे ऑगस्ट या महिन्यात दरवर्षी बाहयलक्षणे युक्त रुग्णांचे सर्व्हेक्षण करण्यात येते. हत्तीरोग रुग्णांना आरोग्य विभागाकडून वर्षातून दोन वेळा पुर्ण औषधोपचार देण्यात येतो. बाह्य लक्षणेयुक्त रुग्णांना विकृती व्यावस्थापन प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. व एकूण ५१ रुग्णांना विकृती व्यवस्थापना करीता विकृती व्यवस्थापन किट शासनामार्फत पुरविण्यात आलेल्या आहेत.