You are currently viewing झिजवली ज्यांनी काया

झिजवली ज्यांनी काया

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*झिजवली ज्यांनी काया*

 

झिजवली ज्यांनी

काया देशासाठी आपली

ज्योत निमाली

प्राणांची..‌

 

स्वतंत्र कराया

अपुला भारत महान

स्वातंत्र्याची शान

रक्षणासाठी…

 

अतुल मनोबल

ध्येयासक्त त्यांचे जीवन

पारतंत्र्याचे दहन

करावयास…

 

त्यागले घरसंसार

संपत्ती नाती गोती

फक्त सोबती

क्रांतीवीर.‌‌..

 

सांडले रूधीर

देशासाठी तन मन

सर्वस्व अर्पण

भारतभूला….

 

जाणून महत्त्व

स्वातंत्र्य आता जपायचे

डाव उधळायचे

अतिरेक्यांचे…

 

स्वातंत्र्य दिनाला

वीरांचे करावे स्मरण

बलिदानास नमन

त्यांच्या…

 

एकजुटीने राहू

समानता आणि धर्म

एकच सत्कर्म

स्वातंत्र्य रक्षण….

 

अरुणा दुद्दलवार @✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा