*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*अजूनही वेळ गेली नाही..!!*
असे काय होते जवळ
ते गेल्याचे दुःख नाही
स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे उलटूनही
त्याचा फारसा आनंद नाही..!
थोरामोठ्यांचे आदर्श त्यांनी
आम्हांला सांभाळायला दिले
त्या आदर्शांच भांडवल करून
एका पीढीला आम्ही मोठे केले ..!
आदर्श अनुकरणास आता फारशी
माणसं शिल्लक नाही
सारं बलीदान व्यर्थ गेलं..त्याची
लाजही आम्हांला वाटत नाही ..!
तेव्हा जर गरजलो असतो तर
आज बेवारशी झालो नसतो
जिभेवर विषाचं अमृत असतं तर
आज वेटोळे घालून स्वस्थ बसलो
नसतो ..!
स्वातंत्र्यदिनी शपथ घ्या..
अजूनही वेळ गेली नाही ..
अजूनही वेळ गेलेली नाही …
भारत मातेच्या माथ्याचं चुंबन घ्या
तिला सांगा! मी तुझ्यावर माझ्या आई
इतकचं प्रेम करतो ..
तु दुःखी होवू नकोस
तुझ्या करताच! माझं जगणं यापुढे
तुझ्या करता कांही पण ! माते..
प्राण मागशील तर ते पण..!
जय भारत!जय हिंद…!!
बाबा ठाकूर धन्यवाद