गांगेश्वर लोरे ते सोनारवाडी रस्त्यावरील अतिक्रमणविरोधातील उपोषण आज दुसऱ्या दिवशीही सुरूच….
कणकवली
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोरे नं.1 ता. कणकवली येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्त्यावर सरपंच यांनी बांध व छप्पर काढून अतिक्रमण केले आहे. या प्रकरणासंदर्भात श्री चंद्रशेखर दशरथ रावराणे, लोरे नं.1 येथील ग्रामस्थ यांनी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना उपोषणाच्या माध्यमातून 15 ऑगस्ट 2024 रोजी निवेदन दिले होते. आज, 16 ऑगस्ट 2024 रोजी उपोषणाचा दुसरा दिवस आहे.
ग्रामस्थांनी प्रशासनाला या अतिक्रमणाच्या विरोधात तात्काळ कारवाईची मागणी केली होती, परंतु अद्याप प्रशासनाकडून कुठलीही ठोस खबरदारी घेतली गेली नाही. यामुळे सामान्य जनतेमध्ये प्रशासनाच्या भूमिकेबद्दल शंका निर्माण झाली आहे. गाव पातळीवर प्रशासनाविषयीचा विश्वास कमी होत चालला आहे, आणि या परिस्थितीत प्रशासनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
ग्रामस्थांना आशा आहे की प्रशासन लवकरात लवकर उपोषणकर्त्यांना न्याय मिळवून देईल आणि या प्रकरणात आवश्यक ती कारवाई करेल. अतिक्रमण करणाऱ्या सरपंचांवर कठोर कारवाई केली जाईल अशी अपेक्षा आहे, किंवा अतिक्रमण त्वरित काढण्यासाठी संबंधितांना आदेश दिले जातील.
आपल्या गावाच्या विकासाची चिंता करणाऱ्या नागरिकांच्या न्याय मागण्यांना प्रशासनाने योग्य प्रतिसाद देणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे प्रशासनावरचा विश्वास कायम राहील आणि गावातील जनतेला न्याय मिळेल, अशी आमची अपेक्षा आहे.
______________________________
*संवाद मीडिया*
👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕
*प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!*
संजिवनी कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२४-२५*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
कामथे हायस्कूल, कामथे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२४-२५* करिता
*GNM* Nursing -3 Years -12th
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*
*या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.*👇
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.
*संपर्क फोन नंबर*
*📲7276850220*
*📲8308723227*
*📲8087865276*
www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…
*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*