You are currently viewing युवा पिढीने सक्षम होऊन देशकार्य करावे! – कृष्णकांत चांडक

युवा पिढीने सक्षम होऊन देशकार्य करावे! – कृष्णकांत चांडक

*”युवा पिढीने सक्षम होऊन देशकार्य करावे! – कृष्णकांत चांडक*

पिंपरी

क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या कार्यापासून प्रेरणा घेत युवा पिढीने शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम होऊन देशकार्य करावे!” असे आवाहन ज्येष्ठ उद्योजक आणि विश्व हिंदू परिषद कोषाध्यक्ष कृष्णकांत चांडक यांनी क्रांतितीर्थ, चापेकर वाडा, चिंचवडगाव येथे गुरुवार, दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी केले. क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या वतीने आयोजित ७८व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण करताना कृष्णकांत चांडक बोलत होते. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती कार्यवाह ॲड. सतिश गोरडे, माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, इनर व्हील क्लब अध्यक्ष सोनाली जयंत, विश्व हिंदू परिषद नगर कार्यवाह भास्कर भोर, क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती उपाध्यक्ष डॉ. शकुंतला बन्सल, सदस्य कांता जाधव, नितीन बारणे, अतुल आडे, आरती आडे, अविनाश आगज्ञान, समर्थ डोंगरे, मिथुन बोरगांव, ओंकार तारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

ॲड. सतिश गोरडे यांनी, “स्वातंत्र्योत्तर काळात गुलामगिरीच्या शृंखला नष्ट करण्यात यश प्राप्त झाले. श्रीराम मंदिर उभारणी किंवा क्रांतितीर्थ चापेकर वाड्याचे पुनरुज्जीवन ही त्याची प्रतीकं आहेत. विद्यार्थ्यांनी भावी काळात आपली कारकीर्द घडविताना देशाची प्रतिष्ठा उज्ज्वल राहील यासाठी योगदान द्यावे!” अशी अपेक्षा व्यक्त केली. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित क्रांतिवीर चापेकर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बँडच्या तालावर पथसंचलन करीत तिरंग्याला अभिवादन केले. सामुदायिक राष्ट्रगीत, ध्वजगीत गायन करून स्वातंत्र्यदिनाचा जयघोष करीत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

शाहीर आसराम कसबे यांनी सूत्रसंचालन केले. सुहास पोफळे यांनी आभार मानले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

_____________________________
*संवाद मीडिया*

*S संजना टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स*

*🔸अंदमान – 5 दि – 33,990/-*

*🔹छत्तीसगड – 5 दि – 24,990/-*

*🔸हिमाचल – शिमला मनाली चंदीगड – 7 दि – 28,990/-*

*🔹काश्मीर वैष्णोदेवी – 6 दि – 32,990/-*

*🔸लेह लडाख – 7 दि – 39,990/-*

*🔹नैनिताल मसुरी कोरबेट – 6 दि – 33,990/-*

*🔸अमृतसर – 4 दि – 17,990/-*

*🔹पांडेचेरी कांचीपुरम महाबलीपुरम – 5 दि – 31,990/-*

*🔸हैदराबाद रामोजी फिल्म सिटी – 5 दि – 32,990/-*

*🔹केरळ कन्याकुमारी – 6 दि – 24,990/-*

*🔸इंदोर उज्जैन मांडू – 4 दि – 25,990/-*

*🔹राजस्थान – मेवाड मारवाड – 7 दि – 28,990/-*

*🔸दिल्ली आग्रा – 4 दि – 20,990/-*

*🔹चार धाम – 13 दि – 71,990/-*

*🔸अहमदाबाद वडोदरा स्टॅच्यू ऑफ युनिटी – 5 दि – 22,990/-*

*🔹हम्पी बदामी – 5 दि – 26,990/-*

*🔸अष्टविनायक यात्रा – 3 दि – 11,990/-*

*🔹ओरिसा – 5 दि – 28,990/-*

*🔸सिक्कीम दार्जिलिंग – 7 दि – 39,990/-*

*जीएसटी आणि टीसीएस अतिरिक्त*

*अधिक माहिती व बुकिंग करिता संपर्क*

*संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स* 🚘🚎✈️🚆

*📲 7350 7350 91/ 7350 534 534*

*जाहिरात
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा