You are currently viewing दीपक केसरकर यांची नौटंकी नाही सहन करणार

दीपक केसरकर यांची नौटंकी नाही सहन करणार

*दीपक केसरकर यांची नौटंकी नाही सहन करणार*

*आमचे नेते स्तुती करत असतील, जनहिताच्या दृष्टीने स्पष्टच बोलणार*

*भाजपा जिल्हा प्रवक्ते सच्चिदानंद उर्फ संजू परब*

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या जनता दरबाराला उपस्थित राहण्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जाणीवपूर्वक टाळले, आयत्यावेळी मुंबईत गेले कबूलायतदार गावकर बैठक बोलावून जिल्हाधिकारी यांचीही अनुपस्थिती दर्शविली. असा गंभीर आरोप माजी नगराध्यक्ष तथा भाजपाचे जिल्हा प्रवक्ते सच्चिदानंद उर्फ संजू परब यांनी आज केला. दीपक केसरकर यांनी नौटंकी बंद करावी, आमचे नेते नारायण राणे त्यांची स्तुती करत असतील, पण मतदार संघाच्या हिताच्यादृष्टीने मी स्पष्टच बोलणार असेही प्रश्नोत्तरा दाखल संजू परब म्हणाले.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा जनता दरबार आज झाला. या पार्श्वभूमीवर भाजपा जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी सायंकाळी सावंतवाडीतील शिल्पग्राम येथे पत्रकार परिषद घेतली.
आपण महायुतीत आहात, आमच्या शिवाय तुमचं काही होणार नाही, तुम्हाला जनतेचे सोयरसुतक काही नाही. आता नाटक बंद करा अशा शब्दात संजू परब यांनी केसरकर यांना सुनावले.
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा जनता दरबार दीपक केसरकर यांना रुचला नाही. असा आरोपही त्यांनी केला.
जाणीवपूर्वक त्यांनी जिल्हाधिकारी यांच्यासह कबुलायतदार गावकरप्रश्र्नि मुंबईत बैठक बोलाविली. मुख्यमंत्री असल्यासारखे दीपक केसरकर घोषणा करतात. तुम्ही जिल्ह्याचे पालक नाही आहात हे भान ठेवा असेही संजू परब म्हणाले.

_____________________________
*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध🔹मधातला आवळा*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ🔸गावठी सुरय तांदूळ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ🔸कडवे वाल*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन🔸पेणचे पांढरे कांदे माळ*
*🔸 मालवणी मसाला🔸खडा मसाला
*🔸 भिमसेनी कापुर🔸मकाना🔸काजुगर*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा