सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालय सिटीस्कॅन मशीनचे उदघाटन पालकमंत्रांच्या शुभहस्ते व्हावे – राजू मसूरकर
सावंतवाडी
पलकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांची जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला तसेच कणकवली उपजिल्हा रुग्णालय सिटीस्कॅन मशीन मी दिलेल्या निवेदनानुसार मंजूर करण्यात आली आहे आणि ती सावंतवाडीमध्ये सध्या प्रायोगिक तत्त्वावर प्रशासनाकडून चालू केली आहे*
*लवकरात लवकर दोन महिन्यांमध्ये कणकवली उपजिल्हा रुग्णालयामध्ये ही सिटीस्कॅन मशीन सुद्धा चालू होणार आहे. यासाठी युद्ध पातळीवरती कणकवली येथे काम चालू आहे.देवगड व वैभववाडी तालुक्यातील नागरिकांना या सिटीस्कॅन मशीन चा लाभ मिळणार आहे.त्याचप्रमाणे सावंतवाडी तालुक्यामध्ये सिटीस्कॅन मशीन बसवल्यामुळे दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यातील नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे. तसेच कुडाळ व मालवण तालुक्यातील नागरिकांना ओरोस जिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅन मशीन शासनाकडून या आधी लावल्याने त्याचा लाभ या दोन्ही तालुक्यांतील नागरिकांना मिळत आहे.*
. *15 ऑगस्ट 2023 या रोजी संपूर्ण महाराष्ट्रात शासकीय रुग्णालयात सर्व आरोग्य सेवा आपल्या सरकारने मोफत केल्याने महाराष्ट्रातील सर्व रुग्णांना सिटीस्कॅन मशीन चे रिपोर्ट यामुळे याचा फायदा रुग्णांना मिळणार आहे.*
*पुणे येथील कृष्णा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत मी दिलेल्या निवेदनानुसार ही मशनरी सावंतवाडी येथे चालू झालेली आहे त्याचे उदघाटन आपल्या शुभहस्ते व्हावे असे जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे मागणी केलेली आहे.*
*संपूर्ण जनतेचा आशीर्वाद पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेबांना नागरिकांकडून मिळत आहे हे माझ्या निदर्शनात आलेले आहे त्यामुळे आपण ही सिटीस्कॅन मशीन सुद्धा लवकरात लवकर त्याचे उद्घाटन आपल्या शुभहस्ते व्हावे असे राजू मसुरकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेबांना उद्घाटन करण्यासाठी मागणी केलेली आहे.*
*त्याचप्रमाणे एक वर्षासाठी बोन्डेड तज्ञ डॉक्टरांना केवळ 80 हजार रुपये दर महिना व शासनामार्फत भरती झालेल्या डॉक्टरांना एक लाख वीस हजार रुपये पगार मिळतो व TA 30 ते 40 हजार प्रती महिना हा पगार शिक्षणाच्या मानाने तुटपुंज असल्याने काँग्रेस पक्षाच्या कारकिर्दीमध्ये 25 वर्षांपूर्वी होता यासाठी शासनामार्फत पगार वाढ झाल्यास संपूर्ण जिल्ह्यामध्ये तज्ञ डॉक्टर महाराष्ट्रात व जिल्ह्यात शासकीय रुग्णालयात मिळू शकतात.*
. *गोरगरीब रुग्णांना खाजगी रुग्णालयात डॉक्टरांकडे जाणे अशक्य असल्याने त्यांचे डोळ्यांमध्ये अश्रू बघून जीव गहिवरून येतो यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये डॉक्टरांना पगार वाढ दिल्यास दोन ते अडीच लाख रुपये पगार वाढ करून दिल्यास डॉक्टर चांगल्या प्रकारे रुग्णांची सेवा करू शकतात असे पालकमंत्री यांना मसुरकर यांनी निवेदन देण्यात आले आहे.*
. *याचप्रमाणे सध्या महाराष्ट्रात पावसाने थैमान घालून अनेक नागरिकांचे अतोनात इमल्याचे नुकसान झाले असून केवळ शासनामार्फत मातीचे घर असल्यास दोन हजार रुपयाची मदत व सिमेंटचे घर असल्यास चार हजार ची मदत त्याचप्रमाणे संपूर्ण घर जमिनदोस्त झाल्यास 1 लाख रुपयांची शासनाकडून मदत दिली जाते यासाठी घरपट्टीमध्ये ग्रामपंचायत व नगरपालिका विमा कर केवळ दोनशे रुपयांमध्ये पाच लाखाचे नुकसान भरपाई मिळू शकते यासाठी शासन निर्णय घ्यावा त्यामध्ये आग लागून नुकसान, भूकंप, पावसाने थैमान घालून घरपडून नुकसान, घरावरती वृक्ष पडून नुकसान तसेच विद्युत शॉर्ट सर्किट मुळे नुकसान अशा विविध कारणामुळे नुकसान झाल्यास केवळ दोनशे रुपयांमध्ये ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचा पाच लाखाचा वार्षिक इमला मालकांना नुकसान भरपाई मिळू शकते*
. *ज्याप्रमाणे महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेला विमा आकारले असून तशाच प्रमाणे विमा घरपट्टी मध्ये आकारावा अशी मागणी व निवेदन पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेबांना जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी देण्यात आली आहे. यावेळी राजन तेली माजी आमदार भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत माजी नगराध्यक्ष संजू परब, एडवोकेट अनिल निरवडेकर उपस्थित होते*
______________________________
*संवाद मिडिया*
*ऑफर… ऑफर… ऑफर….*📢📢
🧥 *Tyzer* 🧥
*👉 फक्त Tyzer घेऊन येत आहे मान्सून ऑफर…*
👚👕🥼👚👕👚🥼👕👚🧥👕👚🥼👕👚👕
*_कोणतेही तीन शर्ट्स खरेदी करा_*
*_फक्त Rs. 1999/-_*
*ऑफर फक्त 18 ऑगस्ट 2024 पर्यंत*
*_चला तर मग आजच भेट द्या_*🏃🏃
*📍पत्ता : टायझर शोरूम, रामेश्वर प्लाझा, मोती तलाव जवळ, सावंतवाडी*
*संपर्क* 📲9881234047
*Advt Web link*
https://sanwadmedia.com/145086/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*