*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी अरुण वी देशपांडे लिखित शिवचरणी भक्ती-रचना*
*जय शिव शंभो, हर हर महादेव ।।*
———————————————–
जय शिव शंभो ,हर हर महादेव ।
श्रीशंकरजी तुम्ही तर देवाधिदेव ।।
नीलकंठ नाव तुम्हास हो मिळाले ।
भागीरथीला मस्तकी धारण केले ।।
सकल भक्त पूजिती उमा महेश्वर ।
नर्तन कलेचे दैवत तुम्हीच नटेश्वर ।।
वेरूळला स्थान तुमचे श्रीघृष्णेश्वर ।
वाराणसी रूप श्री काशीविश्वेश्वर ।।
क्षेत्र परळीचे रूप ते श्री वैजनाथ ।
औंढ्यास दर्शन देई श्रीनागनाथ ।।
भोळ्या भाविकांचे तुम्ही भोलानाथ ।।
तारीता भक्तांचे तुम्हीच दीनानाथ ।।
कैलास पर्वत हो तव निवासस्थान ।
भक्तजन, सारे गण, करी गुणगान ।।
विनवी अरुणदास कवी तुम्हा देवा ।
करावी कृपा सर्वांवरी देवा महादेवा ।।
––——————————————
जय शिव शंभो, हर हर महादेव ।।
-अरुण वि .देशपांडे-पुणे
9850177342
————————————————-