उद्योगपती रतन टाटा यांच्या गाडीच्या नंबरचा गैरवापर केल्याचा एक प्रकार उघडकीस आला आहे. रतन टाटा यांच्या गाडीचा नंबर वापर करत असल्याने ई चलानचे फाईन टाटा यांना दिले जात होते. वाहतूक पोलिसांनी तक्रार केल्यानंतर माटुंगा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मेसर्स नरेंद्र फॉरवर्डेस प्रायव्हेट लिमिटेडच्या नावावर ही गाडी रजिस्टर्ड होती. अंकशास्त्राचा फायदा घेण्याकरिता सदर नंबरचा वापर केला गेला. मात्र सदर प्रकरणात तपास सुरूच आहे.
बनावट नंबर लावून ज्या गाडीचा वापर केला जात होतो, तपासानंतर ई चलानचे फाईन टाटांकडून सदर गाडीवर वर्ग केले जात होते. आरोपींविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे़ रतन टाटांबरोबर हा प्रकार घडल्यामुळे सर्वच स्तरातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे़ प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा हे त्यांच्या समाजसेवेमुळे नेहमीच चर्चेत असतात.
अनेकदा ते करत असलेल्या समाजकार्याचेही अनेक स्तरातून कौतुक होत असते. खरंतर रतन टाटा त्यांच्या कर्मचा-यांची खूप काळजी घेत असतात. मागील दोन वर्षांपासून आजारी असलेल्या एका माजी कर्मचा-याला भेटण्यासाठी रतन टाटा हे थेट मुंबईहून पुण्यात त्यांच्या घरी पोहोचलेत. यावेळी टाटा यांनी संपूर्ण कुटुंबाचा खर्च आणि मुलांच्या शिक्षणाची काळजी घेण्याचं आश्वासन दिले होते़ त्यांच्या या क्षणाचा एक फोटो सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे़.